घरातील नात्यांवर निक्कीची भूमिका, अरबाजला दिलेल्या धोक्यावर दिले स्पष्टीकरण

घरातील नात्यांवर निक्कीची भूमिका, अरबाजला दिलेल्या धोक्यावर दिले स्पष्टीकरण

बिग बॉस मराठी सध्या एका रंगतदार वळणावर आहे. घरातली नाती गरजेनुसार बदलताना दिसत आहेत. यात या घरातली सर्वात वादग्रस्त स्पर्धक असलेल्या निक्की तांबोळीसोबत तर एकाचेही नाते टिकले नसल्याचे दिसून आले आहे. निक्कीच्या टीम A मधील सदस्यही एकामागोमाग एक बाहेर पडले आहेत. सध्या तिच्यासोबत घरात फक्त अरबाज राहिला होता. मात्र गेल्या आठवड्यात अरबाजला देखील टास्कमध्ये दिलेले वचन निक्कीने तोडले होते. त्यामुळे त्या दोघांमध्येही वाद झाले. त्यामुळे निक्की नक्की घरात काय गेम खेळतेय याची प्रेक्षकांनाही उत्सुकता होती.

शनिवारी बिग बॉस मराठीच्या घरात स्पर्धकांना पत्रकारांच्या प्रश्नांना सामोरे जावे लागले. अरबाजसोबत टास्क खेळताना निक्कीने अचानक बदलेल्या गेमवरून तिच्यावर टीकाही झाली. निक्कीचं घरातलं कोणतंच नातं टीकत का नाही असा  प्रश्न विचारताच निक्की भडकली. मात्र तिने स्वत:वर कंट्रोल ठेवत  आपण या घरात नाती बनवायला आली नसल्याची सांगितले.

अरबाज माझा या घरातला मित्र आहे. पण मी त्याला धोका दिलेला नाही. पण मी इथे गेम खेळायला आले आहे. त्यामुळे गेम खेळणार. नाती तर मी घराबाहेर देखील बनवू शकते, असे निक्की म्हणाली. त्यामुळे निक्की या घरात फक्त गेम खेळतेय हे तर स्पष्ट झालंय.

निक्की आणि अरबाज पहिल्या दिवसापासून घरात एकत्र खेळत आले आहेत. निक्कीने अरबाजसोबत मिळून टीम A तयार केली. त्यात जान्हवी किल्लेकर, वैभव चव्हाण आणि छोटा पुढारी घनश्याम दरवडे देखील होता. मात्र जान्हवी व निक्कीचे वाद झाल्यावर ती या ग्रृपमधून बाहेर पडली तर वैभव व घनश्याम घरातून बाहेर पडले आहेत.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;