अशोक सराफ यांचं छोट्या पडद्यावर दमदार कमबॅक; झळकणार नव्या मालिकेत

अशोक सराफ यांचं छोट्या पडद्यावर दमदार कमबॅक; झळकणार नव्या मालिकेत

मराठी कलाविश्वातील सुपरस्टार म्हणजेच अभिनेते अशोक सराफ…. अशोक सराफ यांनी आजवर अनेक सुपरहिट चित्रपट, मालिका आणि नाटकांमध्ये काम केलंय. मध्यंतरी काही दिवस ते छोट्या पडद्यापासून दूर होते. पण आता पुन्हा एकदा छोटा पडदा गाजवायला ते सज्ज आहेत. त्यांची नवी मालिका लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ‘येतोय महाराष्ट्राचा महानायक लवकरच…’, असं म्हणत या मालिकेचा पहिला प्रोमो समोर आला आहे. ‘कलर्स मराठी’च्या ‘अशोक मा.मा.’ या मालिकेच्या माध्यमातून अशोक मामा छोट्या पडद्यावर दमदार कमबॅक करत आहेत.

अशोक सराफ यांची नवी मालिका

‘कलर्स मराठी’ने मालिकेची ‘अशोक मा.मा.’ पहिली झलक प्रेक्षकांच्या समोर आणली आहे. या प्रोमोमुळे या मालिकेबद्दल प्रेक्षकांमध्ये कुतूहल निर्माण झालं आहे. मालिकेचा पहिला प्रोमो आऊट झाला आहे. प्रेक्षकांलाठी एक खास सरप्राईज देण्यात आलं आहे. टेलिव्हिजनचा पडदा व्यापून टाकायला महाराष्ट्राचा महानायक परत येतोय. नुकताच ‘अशोक मा.मा.’ या मालिकेचा उत्कंठा वाढवणारा प्रोमो आऊट झाला आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Colors Marathi (@colorsmarathi)

‘अशोक मा.मा.’ या मालिकेचा प्रोमो पाहताक्षणी काहीतर गूढ, थरारक असल्याचं जाणवतंय. प्रत्येक गोष्टीची खबरदारी घेणारे, अत्यंत शिस्तप्रिय, काटेकोरपणे वागणारे अशोक मामा दिसत आहेत. तसेच ‘शिस्त म्हणजे शिस्त’ हा त्यांच्या आयुष्याचा फंडा असल्याचं प्रोमोमध्ये स्पष्ट होत आहे. पण त्यांच्या मिश्कील अंदाजाने सर्वांच्या चेहऱ्यावर ते हसू आणणार आहेत. प्रोमोतील शेवटच्या फ्रेममध्ये दारावर लावलेल्या नेम प्लेटमध्ये ‘अशोक मा.मा.’ असं दिसत आहे. एकंदरीतच अशोक मामा आणि मालिकेतील त्यांच्या पात्राचं नाव सारखंच आहे. अशोक सराफ यांच्यासोबतच आणखी कोणते कलाकार मालिकेत झळकणार?, याबाबत उत्सुकता आहे.

‘अशोक मा.मा.’ या मालिकेचा पहिला प्रोमो समोर आल्याने प्रेक्षकांची उत्सुकता आता शिगेला पोहोचली आहे. या मालिकेबाबत अशोक सराफ यांनी त्यांच्या भावना व्यक्त केल्या. मालिका खूपच मनोरंजक आहे. चिन्मय मांडलेकरने या मालिकेची कथा खूप चांगल्या पद्धतीने लिहिली आहे. ‘टन टना टन’ या मालिकेनंतर अनेक वर्षांनी पुन्हा ‘कलर्स मराठी’ वाहिनीच्या माध्यमातून मी टेलिव्हिजनवर कमबॅक करतोय. शूटिंग करताना खूप मजा येतेय. प्रेक्षकांनाही ही मालिका नक्कीच आवडेल, असं अशोक सराफ म्हणाले.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;