दुसऱ्या लग्नानंतर अभिनेत्रीच्या आयुष्यात मोठे वादळ, रडत म्हणाली, माझ्या मुलाला…

दुसऱ्या लग्नानंतर अभिनेत्रीच्या आयुष्यात मोठे वादळ, रडत म्हणाली, माझ्या मुलाला…

अभिनेत्री दलजीत काैर ही गेल्या काही दिवसांपासून तिच्या अभिनयापेक्षाही अधिक खासगी आयुष्यामुळे चर्चेत आहे. दलजीत काैर ही सोशल मीडियावर सक्रिय दिसते. आपल्या चाहत्यांसाठी फोटो आणि व्हिडीओ शेअर करताना दलजीत काैर दिसते. दलजीत काैरचे पहिले लग्न शालिन भनोट याच्यासोबत झाले. शालिन आणि दलजीतचा एक मुलगा आहे. लग्नाच्या काही वर्षांनंतर दोघांचा घटस्फोट झाला. पहिल्या घटस्फोटानंतर दलजीत काैर हिने केन्याचा बिझनेसमॅन निखिल पटेल याच्यासोबत लग्न केले. मात्र, लग्नाच्या दहा महिन्यांनंतरच दलजीत काैर हिचे हे लग्न तुटले. निखिलसोबतच्या लग्नानंतर भारत सोडून केन्याला दलजीत काैर ही शिफ्ट झाली होती.

दलजीत काैर हिने निखिल पटेल याच्यावर गंभीर आरोप केले. ज्यावेळी मुलाला भारतात घेऊन अचानक दलजीत काैर ही आली, तेंव्हापासूनच तिच्या घटस्फोटाच्या चर्चा सुरू होत्या. निखिल पटेल याचे लग्न झाल्यानंतरही एका मुलीसोबत अफेअर सुरू असल्याचा आरोप हा दलजीत काैर हिच्याकडून करण्यात आला. आता यांचे प्रकरण कोर्टात सुरू आहे.

काही दिवसांपूर्वीच दलजीत काैर ही केन्यामध्ये आपले सामान घेण्यासाठी पोहोचली होती. मात्र, यावेळी निखिल पटेल याने तिला घरात प्रवेश करू दिला नाही. सध्या दलजीत काैर आणि निखिल पटेल यांच्यातील वाद हा चांगलाच वाढल्याचे बघायला मिळतंय. निखिल पटेल यानेही दलजीत काैरवर काही आरोप केले आणि नेमके काय घडले हे सांगितले.

आता सर्वकाही विसरून दलजीत काैर ही आयुष्यात पुढे जाताना दिसत आहे. आता दलजीत काैर हिने व्लॉगिंग सुरू केलीये. मुलासोबत गोव्याला दलजीत काैर ही पोहोचली आहे. यावेळीचा एक खास व्हिडीओ तिने सोशल मीडियावर शेअर केलाय. दलजीत काैर म्हणाली की, मी माझ्या दुसऱ्या लग्नाला माझी हार मानत नाही.

मी आता माझ्या दुसऱ्या लग्नाला माझी ताकत मानते. मी आता पुढे जाणार आहे. मला माझ्या मुलाला सांभाळायचे आहे आणि स्वत:च्या जखमा देखील भरायच्या आहेत. व्हिडीओमध्ये हे सर्वकाही बोलताना दलजीत काैर ही रडताना देखील दिसत आहे. मागील काही दिवस दलजीत काैर हिच्या आयुष्यात मोठे वादळ आल्याचे बघायला मिळावे. दलजीत काैर ही सध्या सोशल मीडियावर खूप सक्रिय दिसत आहे.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;