‘मोहब्बतें’ फेम अभिनेत्रीच्या पतीचा गंभीर अपघात; आरोग्याविषयी दिली माहिती

‘मोहब्बतें’ फेम अभिनेत्रीच्या पतीचा गंभीर अपघात; आरोग्याविषयी दिली माहिती

‘मोहब्बतें’ या चित्रपटात भूमिका साकारलेली अभिनेत्री प्रीती झांगियानीचा पती परवीन डबासचा शनिवारी सकाळी गंभीर अपघात झाला होता. या अपघातानंतर त्याला मुंबईतील वांद्रे इथल्या एका खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं होतं. परवीनसुद्धा बॉलिवूड अभिनेता असून त्याच्यावर आयसीयूमध्ये उपचार सुरू होते. आता प्रीतीने पतीच्या आरोग्याविषयीची माहिती दिली आहे. अपघातात परवीनच्या डोक्याला मार लागला होता. त्यामुळे अजूनही त्याची प्रकृती ठीक नसल्याचं तिने म्हटलंय. परंतु लवकरच त्याला आयसीयूमधून बाहेर काढण्याची शक्यता तिने वर्तवली आहे.

‘हिंदुस्तान टाइम्स’शी बोलताना प्रीती म्हणाली, “आम्हा सर्वांसाठी हा खूप धक्का आहे. त्यातून भावनिकदृष्ट्या सावरण्याचा आम्ही अजूनही प्रयत्न करतोय. तो खूप बोलका आहे आणि तो त्याच्या कामाविषयी न बोलता एक मिनिटंही राहू शकत नाही. त्यामुळे अशा व्यक्तीला बेडवर शांतपणे पडून राहिलेलं बघणंच खूप त्रासदायक आहे. माझ्या कुटुंबासाठी हा काळ खूप कठीण आहे.”

“त्याला अजूनही चक्कर येणं, अस्पष्ट दिसणं, मळमळ अशा समस्या जाणवत आहेत. डोक्याला मार लागल्यामुळे ही सर्व लक्षणं दिसत आहेत. यामुळे तो फार बोलूही शकत नाहीये. सुदैवाने त्याचे एमआरआय आणि सीटी स्कॅनचे रिपोर्ट क्लिअर आले आहेत. अजून एक आठवडा तरी त्याला रुग्णालयातच राहावं लागणार आहे. तो लवकरच आयसीयूमधून बाहेर येईल, अशी आशा आहे. तीन दिवसांनंतर डॉक्टर पुन्हा एकदा सीटी स्कॅन करतील”, अशीही माहिती प्रीतीने दिली.

 

View this post on Instagram

 

A post shared by Pro Panja League (@propanjaleague)

अपघाताच्या वेळी परवीनने मद्यपान केलं नव्हतं, असं प्रीतीने पुन्हा एकदा स्पष्ट केलं. अपघाताची बातमी समोर आल्यानंतर परवीनने मद्यपान केलं होतं, अशा चर्चांना उधाण आलं होतं. प्रीतीने या सर्व चर्चा फेटाळल्या आहेत. “तो मद्यपान करून ड्राइव्हिंग करत नव्हता. पोलिसांच्या रिपोर्टमध्येही हे स्पष्ट झालंय. गाडी चालवताना तो खूप सजग असतो आणि कधीच मद्यपान करून तो गाडी चालवत नाही”, असं तिने पुढे म्हटलंय.

परवीन दाससुद्धा बॉलिवूड अभिनेता असून त्याने ‘खोसला का घोसला’ या चित्रपटात भूमिका साकारली होती. ‘शर्माजी की बेटी’ या चित्रपटात आणि ‘मेड इन हेवन’ या वेब सीरिजमध्येही त्याने काम केलंय.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;