अजितदादांचा जावलीतील मोहरा पवारांच्या भेटीला

अजितदादांचा जावलीतील मोहरा पवारांच्या भेटीला

शरद पवार यांच्याशी द्रोह करून भाजपच्या कच्छपी लागलेल्या उपमुख्यमंत्री अजित पवार यांना धक्क्यामागून धक्के बसत असताना, आज साताऱ्यात आणखी एक धक्का बसला. पक्षफुटीनंतर अजित पवारांच्या गटात सामील झालेल्या अमित कदम यांनी आज शरद पवार यांची भेट घेऊन सातारा-जावलीतून तुतारीच्या चिन्हावर लढण्याची इच्छा व्यक्त केली.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थापनेपासूनच सातारा जिल्हा शरद पवारांचा  बालेकिल्ला राहिला आहे. पक्षफुटीनंतर आमदार मकरंद पाटील, रामराजे नाईक-निंबाळकर यांच्याप्रमाणे अमित कदम यांच्यासारखे दुसऱ्या फळीतले काहीजण अजित पवारांच्या गटात गेले. मात्र, पवारांची साथ सोडल्याने अजित पवार यांना सातत्याने झटके बसत आहेत, त्यामुळे अनेक नेते त्यांची साथ सोडताना दिसत आहेत. या गळतीचे लोण साताऱयातही मोठय़ा प्रमाणावर पोहोचल्याचे दिसत आहे.

गेल्या काही दिवसांत साताऱयातील महायुतीच्या गोटात असलेल्या जवळपास 29 जणांनी शरद पवारांची भेट घेऊन उमेदवारीची मागणी केली आहे. त्यात आज अमित कदम यांच्यासारखा अजित पवारांचा मोहरा शरद पवार यांच्या दरबारात पोहोचल्याने अजित पवार गटाला मोठा धक्का बसला आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;