श्वेता तिवारीच्या पहिल्या नवऱ्याचं धक्कादायक वक्तव्य, ‘प्रॉपर्टी घेतली, कोर्टात गेल्यानंतर तर…’

श्वेता तिवारीच्या पहिल्या नवऱ्याचं धक्कादायक वक्तव्य, ‘प्रॉपर्टी घेतली, कोर्टात गेल्यानंतर तर…’

अभिनेत्री श्वेता तिवारी हिला आज कोणत्याच ओळखीची गरज नाही. अभिनेत्रीने स्वतःच्या मेहनतीच्या जोरावर इंडस्ट्रीमध्ये ओळख निर्माण केली आहे. टीव्ही विश्वातील प्रसिद्ध आणि लोकप्रिय अभिनेत्री म्हणून श्वेता तिवारी हिची ओळख आहे. श्वेता हिला प्रोफेशनल आयुष्यात यश मिळालं. पण अभिनेत्रीने खासगी आयुष्यात अनेक चढ – उतार पाहिले आहेत. श्वेता हिने दोन वेळा लग्न केलं. पण अभिनेत्रीचे दोन्ही लग्न अपयशी ठरले. श्वेताच्या पहिल्या नवऱ्याचं नाव राजा चौधरी असं आहे.

श्वेता तिवारी आणि राजा चौधरी यांनी 1998 मध्ये लग्न केलं. हे लग्न अभिनेत्रीत्या कुटुंबियांना मान्य नव्हतं. पण तरी देखील कुटुंबियांच्या विरोधात जाऊन अभिनेत्री राजा चौधरीसोबत लग्न केलं. लग्नानंतर श्वेताने लेक पलक हिला जन्म दिला. पण राजा चौधरी – श्वेता यांच्यातील प्रेम दिवसाणिक कमी होत जात होतं. अखेर दोघांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतला.

 

 

View this post on Instagram

 

A post shared by Shweta Tiwari (@shweta.tiwari)

 

अभिनेत्रीने नवऱ्यावर अनेक गंभीर आरोप केले होते. लग्नाच्या 9 वर्षांनंतर राजा आणि श्वेता यांचा घटस्फोट झाला. श्वेता हिने पहिल्या नवऱ्यावर मानसिक आणि शारीरिक छळाचे आरोप केले होते. पण एका मुलाखतीत राजा याने सर्व आरोप फेटाळले. राजा याने देखील अभिनेत्रीवर आरोप केले.

राजा म्हणाला, ‘कसौटी जिंदगी की’ मालिकेच्या सेटवर श्वेताच्या अनेक ओळखी झाल्या होत्या. तिला सल्ला देणाऱ्यांची संख्या देखील वाढत होती. प्रसिद्धी आणि लोकप्रियता मिळाल्यानंतर या पुरुषासोबत का राहू? असं तिला वाटू लागलं होतं. तेव्हा श्वेताचं खाजगी आयुष्यापेक्षा करियरवर अधिक लक्ष होतं.’

‘श्वेता दिवसातील 16 – 17 तास काम करायचा. माझ्यासाठी तिच्यासाठी वेळच नव्हता. तिने माझ्यावर मानसिक आणि शारीरिक छळाचे आरोप केले. ज्यामध्ये काहीही तथ्य नव्हतं. कोर्टाची पायची चढल्यानंतर आपल्यावर 2 -4 खोटे आरोप करण्यात येतात.’

पुढे राजा चौधरी म्हणाला, ‘घटस्फोटानंतर श्वेताने माझी सर्व प्रॉपर्टी घेतली. माझ्याकडे फक्त फ्लॅट राहिलेला होता. ज्यामध्ये मी राहात होतो. माझी लेक पलक हिला देखील माझ्यापासून दूर केलं.’ असं देखील श्वेता तिवारी हिचा पहिला नवरा राजा चौधरी म्हणाला होता. पण आता पलक तिच्या वडिलांना भेटते शिवाय दोघे एकमेकांना इन्स्टाग्राम फॉलो देखील करतात. श्वेता कायम तिच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत असते.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;