खंबाटकी घाटात थरार भरधाव कंटेनरने दहा गाड्यांना उडविले, 12 प्रवासी जखमी

खंबाटकी घाटात थरार भरधाव कंटेनरने दहा गाड्यांना उडविले, 12 प्रवासी जखमी

सातारा महामार्गावर खंबाटकी बोगद्याजवळील एस कॉर्नर परिसरात आज सायंकाळी बेकफेल कंटेनरच्या थरारनाट्याने अनेकांच्या काळजाचा ठोका चुकला. तीव्र उतारावर चालकाचा ताबा सुटलेल्या कंटेनरने दहा वाहनांना धडक दिल्याने 12 प्रवासी जखमी झाले. तसेच वाहनांचेही मोठे नुकसान झाले. पोलिसांनी कंटेनरचालकाला ताब्यात घेतले आहे. अपघातानंतर खंडाळा पोलीस, भुईंज महामार्ग पोलीस, शिरवळ रेस्क्यू टीमच्या सहकार्याने जखमींना खंडाळा येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले आहे.

पुणे-बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावरील सातारा ते पुणे जाणाऱ्या मार्गावर खंबाटकी बोगदा ओलांडल्यानंतर असलेल्या एस कॉर्नर परिसरात सायंकाळी चारच्या सुमारास हे थरारनाट्य घडले. ब्रेक निकामी (फेल) झालेल्या भरधाव ट्रकने दहा वाहनांना धडक दिली. या अपघातामध्ये तीनजण गंभीर जखमी झाले, तर नऊ प्रवासी किरकोळ जखमी झाले. रमेश श्यामराव पाटील, राज रमेश पाटील (रा. वाकुर्डे, ता. शिराळा) आणि सजल गिरीराज शर्मा (रा. पुणे) हे तिघेजण गंभीर जखमी झाले. अन्य नऊजण किरकोळ जखमी झाले. जखमींवर खंडाळ्याच्या ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.

खंबाटकी बोगदा ओलांडल्यानंतर एस कॉर्नर परिसरामध्ये कंटेनरचा बेक फेल झाल्याचे चालकाच्या लक्षात आले. यावेळी चालकाने एकसारखे हॉर्न वाजवत ट्रक नियंत्रणात करण्याचा प्रयत्न केला, मात्र तीव्र उतारामुळे ट्रकचा वेग वाढल्याने त्याने दहा वाहनांना उडविले. यामध्ये रिक्षासह सात मोटारींचा समावेश आहे. सुदैवाने यामध्ये जीवितहानी झाली नाही. अपघाताची माहिती समजताच खंडाळ्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष म्हस्के, भुईंज महामार्ग वाहतूक उपनिरीक्षक विजय जाधव यांनी पथकासह घटनास्थळी धाव घेतली. खासगी क्रेनच्या साहाय्याने अपघातग्रस्त वाहने बाजूला करण्यात आली. त्यानंतर वाहतूक सुरळीत केली.

पळून निघालेल्या चालकाला ‘प्रसाद’

अंगावर काटा आणणाऱया या थरारक घटनेनंतर वाहन न थांबवता चालकाने पलायन करण्याचा प्रयत्न केला, परंतु इतर प्रवाशांनी त्याचा पाठलाग करून जुन्या टोलनाक्याजवळ कंटेनर थांबवून चालकाला चांगलाच प्रसाद दिला.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;