मुंबईच्या पर्यटन स्थळांवर 35 कोटींची अद्ययावत शौचालये, अद्ययावत नऊ शौचालयांसाठी पालिका निविदा काढणार

मुंबईच्या पर्यटन स्थळांवर 35 कोटींची अद्ययावत शौचालये, अद्ययावत नऊ शौचालयांसाठी पालिका निविदा काढणार

मुंबई शहरातील पर्यटन स्थळांना भेट देणाऱ्या देशविदेशातील पर्यटकांना स्वच्छतागृहांची उत्तम सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी मुंबई महापालिकेने 14 इंस्पिरेशनल शौचालये बांधण्याचा निर्णय घेतला आहे. यातील चार शौचालयांसाठी निविदा काढल्यानंतर आता आणखी 9 शौचालयांच्या बांधकामासाठी लवकरच निविदा काढल्या जाणार आहेत. ही शौचालये वातानुकूलितसह विविध सुविधांयुक्त असणार आहेत. यासाठी जिल्हा नियोजन समितीकडून (डीपीडीसी)  निधी दिला जाणार असून 35 कोटी रुपये खर्च केला जाणार आहे.

मुंबई शहरातील पर्यटन स्थळांना भेटी देण्यासाठी देशविदेशातील पर्यटक भेटी देतात. पर्यटन स्थळांच्या ठिकाणी चांगल्या स्थितीतील शौचालयांची सुविधा नसल्याने पर्यटकांची विशेषतः महिलांना गैरसोयींना सामोरे जावे लागते. मुंबई शहराचे पालकमंत्री दीपक केसरकर यांनी पर्यटनस्थळी शौचालये बांधण्याची सूचना केली होती.  एकूण 14 शौचालये बांधण्यासाठी 35 कोटी रुपये खर्च केले जाणार आहेत. या आधी चार ठिकाणी शौचालय बांधकामासाठी निविदा काढण्यात आली आहे.

येथे शौचालये बांधणार

ठिकाण               शौचकूप

लायन गेट               17

विधानभवन             20

उच्च न्यायालयासमोर    26

फॅशन स्ट्रीट             14

गिरगाव, दर्शक गॅलरी     20

बाणगंगा                  14

राणीबागजवळ         20

हायवे अपार्टमेंट, शीव     20

हाजी अली जंक्शन  16

सिद्धिविनायक मंदिर परिसर  20

वरळी सी लिंक मार्ग  16

माहीम रेती बंदर       14

धारावी 60 फीट रोड   18

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;