मी माझ्या बापाचंही ऐकत नाही…बहिणीच्या पॉडकॉस्टवरच भडकली प्रसिद्ध अभिनेत्री; ते घडलं अन्…

मी माझ्या बापाचंही ऐकत नाही…बहिणीच्या पॉडकॉस्टवरच भडकली प्रसिद्ध अभिनेत्री; ते घडलं अन्…

प्रसिद्ध भोजपुरी स्टार आम्रपाली दुबे गेल्या काही दिवसांपासून सतत चर्चेत आहे. आम्रपाली नुकतीच तिची बहीण आकांक्षा दुबेच्या पॉडकास्टला गेली होती. बहिणीच्या पॉडकास्टवर आम्रपालीने तिच्या आयुष्यातील माहीत नसलेल्या गोष्टी सांगितल्या. यावेळी आकांक्षाने आम्रपालीच्या जाडेपणावरही सवाल केला. त्यावेळी आम्रपाली चांगलीच भडकली. मला वजन कमी करायचं असेल तर माझ्या मनाने करेल. कुणाच्या सांगण्यावरून करणार नाही. मी माझ्या बापाचं ऐकत नाही. दुसरं कुणाचं का ऐकू? असा सवालच आम्रपालीने केला. आम्रपालीच्या या उत्तराने तिची बहीण आकांक्षाचा चेहरा चांगलाच पाहण्यासारखा झाला होता.

माझं वजन 100 किलो होतं. त्यावेळी मला बॉडी शेमिंगला सामोरे जावं लागलं. मी जाडी असल्याने मला चिडवलं जात होतं. तुला सुद्धा वजनामुळे अशा प्रकाराला सामोरे जावं लागलं का?, असा सवाल आकांक्षाने आम्रपालीला केला होता. त्यावर तिने हे उत्तर दिलं. बघ, मी माझ्या शरीरावर प्रचंड प्रेम करते. माझं हे शरीर मला अडचणीचं वाटत नाही. मला डायबिटीज नाही. मला थायरॉईडची समस्या नाही. मला आयुष्यात कोणताही त्रास होऊ नये म्हणून मला वजन कमी करायचं आहे, असं आम्रपाली म्हणाली.

मला फरक पडत नाही

एक अभिनेत्री म्हणून त्यांच्या पॅरामीटरमध्ये मी फिट बसत नाही असं कुणाला वाटत असेल तर मला त्याचा फरक पडत नाही. जी अभिनेत्री फिट बसते तिला कास्ट करा. काम करण्यासाठी मरायलाही तयार असलेले अनेक लोक इंडस्ट्रीत आहेत. मी त्यांचं मोठ्या मनाने स्वागत करते. त्या लोकांकडून काम करून घ्या. तुमच्या ब्युटी स्टँडर्डमध्ये बसणाऱ्या अनेक अनेक मुली आहेत. अनेक मुली इंडस्ट्रीत संघर्ष करत आहेत. कृपया त्यांना कास्ट करा. मला खरोखरच त्यांना काम करताना पाहायचं आहे, असंही आम्रपालीने सांगितलं.

पापा शो पाहणार आहेत…

मी अशीच आहे. मला जेवढं काम येतंय ते जगाने पाहिलंय. मी तेच काम करते आणि त्यावर फोकस करते. मला माझी बॉडी चेंज करायची असेल तर केवळ मला वाटतं म्हणून मी ते करेल. कुणाला वाटतं म्हणून नाही. कुणी ट्रोल केलं म्हणून नाही. तुम्हाला या बिझनेसमध्ये राहायचं असेल तर असं दिसावं लागेल, असं कुणी म्हणत असेल तर मी माझ्या बापाचंही ऐकत नाही. बाकीच्यांच काय ऐकणार?, असं ती म्हणाली. त्यावर, पापा शो पाहणार आहेत, असं आकांक्षाने मस्करीत म्हटलं. तेव्हा, पापाचं ऐकते. पण मी माझ्याबाबत एक गोष्टही बदलणार नाही, असं आम्रपाली हसत म्हणाली.

त्या कमेंट मी वाचल्या

मी माझ्या बॉडी शेमिंगशी डील केलंय. मी ते सर्व काही ऐकलंय. मी त्या कमेंट्स वाचल्या आहेत. अशा कमेंट करणाऱ्यांना मी ब्लॉक करत असते. कमेंट डीलिटही करते. माझे अनेक फॅन पेज आहेत. त्यावरून अशा कमेंट करणाऱ्यांना उत्तर दिलं जात आहे, असंही तिने सांगितलं.

कोई तुम्ही प्यार…

ज्या लोकांना तुम्ही आवडता, ते लोक तुम्हाला आहे तसंच स्वीकारतात, असं सांगतानाच आम्रपालीने यावेळी शाहरुख खानच्या मोहब्बते सिनेमातील डायलॉग ऐकवला. “कोई तुम्हें प्यार करे, तो तुम जैसे हो वैसे करे. कोई बदल कर प्यार करे तो वो प्यार नहीं, सौदा है.” असं ती म्हणाली.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;