Satara News – खंबाटकी घाटात ट्रकची सात वाहनांना धडक, अपघातात तिघे गंभीर जखमी

Satara News – खंबाटकी घाटात ट्रकची सात वाहनांना धडक, अपघातात तिघे गंभीर जखमी

सातारा-पुणे महामार्गावर खंबाटकी घाटात ट्रकने सात वाहनांना धडक दिल्याची घटना रविवारी दुपारी घडली. या अपघातात तीन जण गंभीर जखमी झाले तर सहा जण किरकोळ जखमी झाले. तसेच वाहनांचे मोठे नुकसान झाले आहे. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नाही.

खंबाटकी घाटातील बोगदा ओलांडल्यानंतर तीव्र उतारावर ट्रकचे ब्रेक फेल झाले. चालकाच्या ही बाब लक्षात येताच त्याने चालकाने गाडीला नियंत्रित करण्याचे प्रयत्न केले. मात्र उतार असल्याने ट्रक नियंत्रित करणे अवघड झाले आणि अखेर सात वाहनांना ट्रकने धडक दिली. यामध्ये रिक्षासह सहा कारचा समावेश आहे.

दुर्घटनेत कोणताही जीवितहानी झाली नसली तरी तीन जण गंभीर जखमी झाले आहेत. रमेश शामराव पाटील, राज रमेश पाटील आणि सजल गिरीराज शर्मा अशी जखमींची नावे आहेत. तिघांवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;