सरकार येईल की नाही माहित नाही, पण आठवले पुन्हा मंत्री होतील; गडकरी यांची गॅरंटी

सरकार येईल की नाही माहित नाही, पण आठवले पुन्हा मंत्री होतील; गडकरी यांची गॅरंटी

आमचे सरकार पुन्हा येण्याची गॅरंटी नाही. मात्र सरकार कुणाचंही आलं तरी रामदास आठवले पुन्हा मंत्री होतील याची गॅरंटी असल्याचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी म्हटले आहे. नागपुरात आयोजित एका पुरस्कार वितरण सोहळ्यात गडकरी बोलत होते.

नागपुरात मारवाडी फाऊंडेशनतर्फे भारतरत्न बाबासाहेब आंबेडकर पुरस्काराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी नितीन गडकरी यांच्या हस्ते केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांना पुरस्कार देण्यात आला. यावेळी रामदास आठवले यांनी आपले मनोगत व्यक्त करताना आतापर्यंत तीन वेळा मंत्रीपद मिळाले आणि चौथ्यांदा सरकार आल्यानंतर आपण मंत्री होणारच असे ठामपणे सांगितले.

आठवले यांच्या वक्तव्यावर नितीन गडकरी यांनी आपल्या भाषणात प्रतिक्रिया दिली. आपल्या भाषणात बोलताना गडकरी यांनी आम्हाला चौथ्यांदा सरकार येण्याची गॅरंटी नाही. मात्र रामदास आठवले यांना सरकार येऊन ते मंत्री होण्याची गॅरंटी आहे. सरकार कोणाचेही आले तरी आठवले यांचे मंत्रिपद पक्के आहे, असे म्हटले आहे.

रामदास आठवले हे राजकारणातील हवामान शास्त्रज्ञ असून त्यांना हवा कुठल्या दिशेने चालते याचा अंदाज येतो, असे म्हणत गडकरींनी आठवलेंना कोपरखळी मारली आहे. रामदास आठवलेंना मी मनापासून शुभेच्छा देतो. त्यांना उत्तम आयुष्य आणि निरोगी जीवन प्राप्त व्हावं अशी मी प्रार्थना करतो. आठवलेंनी त्यांचं आयुष्य दलित, पीडित, शोषित माणसांसाठी दिलेलं आहे. या माध्यमातून सामाजिक आणि आर्थिक परिवर्तन करण्यात ते यशस्वी होतील, असा विश्वासही गडकरी यांनी व्यक्त केला आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;