राज्यातूनच नाही, तर देशभरातून भाजपचा सफाया निश्चित; सत्यपाल मलिक यांचा भाजपवर हल्लाबोल

राज्यातूनच नाही, तर देशभरातून भाजपचा सफाया निश्चित; सत्यपाल मलिक यांचा भाजपवर हल्लाबोल

जम्मू कश्मीरचे माजी राज्यपाल सत्यपाल मलिक सध्या मुंबई दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यात त्यांनी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. उद्धव ठाकरे यांची भेट घेण्यासाठी मलिक मातोश्री वर आले होते. या भेटीवेळी शिवसेना( उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, खासदार संजय राऊतही उपस्थित होते.

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपविरोधात मलिक यांनी प्रखर आणि ठाम भूमिका घेतली आहे. पुलवामा हल्ला, अदानी, अंबानी यासह महत्त्वाच्या विषयांवर वक्तव्य केल्यामुळे मलिक चर्चेत आले होते. त्यामुळे या भेटीला महत्त्व आले आहे. उद्धव ठाकरे आणि सत्यपाल मलिक यांच्यात सुमारे अर्धा तास चर्चा झाली आहे. या बैठकीनंतर मातोश्रीबाहेर आल्यावर मलिक यांनी प्रसारमाध्यमांना प्रतिक्रिया दिली.

राज्यातच नाही तर देशात भाजपचा सफाया निश्चित आहे. तसेच भाजपचा सफाया करण्यात उद्धव ठाकरे यांची महत्त्वाची भूमिका असेल, असेही त्यांनी स्पष्ट केले. महाविकास आघाडी आणि इंडिया आघाडीला आपला पाठिंबा असल्याचेही त्यांनी सांगितले.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;