अमेरिकेच्या अलबामा येथे गोळीबार, 4 लोकांचा मृत्यू तर 12 हून अधिक जण जखमी

अमेरिकेच्या अलबामा येथे गोळीबार, 4 लोकांचा मृत्यू तर 12 हून अधिक जण जखमी

गोळ्यांच्या आवाजाने अमेरिका पुन्हा हादरली आहे. अमेरिकेच्या अलबामा येथे गोळीबार झाल्याची घटना घडली आहे. यामध्ये 4 लोकांचा मृत्यू झाला असून बाराहून अधिक लोकं जखमी झाले आहेत. ही घटना शनिवारी रात्री उशीरा घडली आहे. पोलिसांनी सांगितले की, अधिकाऱ्यांनी एक मोठा गोळीबार झाल्याचा रिपोर्ट दाखल केला आहे.

बर्मिंगहॅम पोलीस विभागाकडून एक्सवर एका पोस्टमध्ये लिहीले की, अधिकारी अनेक लोकांना गोळी लागल्याच्या घटनेनंतर घटनास्थळी पोहोचले. ज्यामध्ये अनेक लोकं जखमी झाल्याची शक्यता आहे. हा गोळीबार शहराच्या फाइव्ह पॉईण्ट साऊथ परिसरात झाला आहे. मीडीया वृत्तानुसार, गोळीबारात 4 लोकांचा मृत्यू झाला असून बाराहून अधिक लोकं जखमी झाली आहेत.

बर्मिंगहॅम पोलिस आणि अग्निशामक फाइव्ह पॉइंट्स साउथजवळच्या गोळीबाराचा तपास करत आहेत.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;