‘सुशांतच तुझ्या घराचे EMI…’, अंकिता लोखंडेचा जुना व्हिडीओ तुफान व्हायरल, घराबद्दल असं काय म्हणाली अभिनेत्री…

‘सुशांतच तुझ्या घराचे EMI…’, अंकिता लोखंडेचा जुना व्हिडीओ तुफान व्हायरल, घराबद्दल असं काय म्हणाली अभिनेत्री…

‘पवित्र रिश्ता’ मालिकेच्या माध्यमातून चाहत्यांच्या भेटीस आलेली अभिनेत्री अंकिता लोखंड कायम कोणत्या न कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. आता देखील अंकिता हिचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये अंकिता तिच्या मुंबईतील पहिल्या घराबद्दल बोलताना दिसत आहे. पण व्हिडीओ पाहिल्यानंतर सुशांतच्या चाहत्यांनी अभिनेत्रीला ट्रोल केलं आहे. व्हिडीओवर चाहते कमेंट करत संताप व्यक्त करत आहेत.

व्हिडीओमध्ये अंकिता लोखंडे म्हणते, ‘मी पहिल्यांदा माझं घर घेतलं. जे मलाड याठिकाणी आहे आणि ते घर 4BHK आहे. ते घर खरेदी करणं माझ्यासाठी फार खास आहे. फार कमी वयात मी घर खरेदी केलं. मुंबईत घर भाड्याने घेण्याचा विचार मी करत होती. पण भाडं फार जास्त होतं. त्यामुळए मी विचार केला की स्वतःचं घर विकत घ्याव… अशा प्रकारे मुंबईत माझं पहिलं घर झालं.’

‘मुंबईत स्वतःची जागा असणं फार महत्त्वाचं आहे. लोकं तुमच्या घरी आल्यानंतर त्यांना राहण्यासाठी जागा असली पाहिजे आणि तुमचं मन मोठं असलं पाहिजे…’ असं अंकिता लोखंडे बोलताना दिसत आहे. सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त अंकिता लोखंडे हिच्या व्हिडीओची चर्चा रंगली आहे.

व्हिडीओमध्ये अंकिता तिच्या घराबद्दल बोलताना दिसत आहे, पण अनेकांनी अभिनेत्रीला ट्रोल केलं आहे. एक नेटकरी कमेंट करत म्हणाला, ‘ते घर सुंशात याचं होतं आणि ते 4BHK नसून वेग-वेगळे 2BHK फ्लॉट होते.’, दुसरा नेटकरी म्हणाला, ‘मला असं वाटतं की ते घर तुझं नसून तुझ्या नवऱ्याचं आहे.’, एवढंच नाही तर अन्य एक नेटकरी म्हणाला, ‘घराचे EMI सुशांत भरायचा…’ सध्या सर्वत्र व्हिडीओची चर्चा रंगली आहे.

सुशांत सिंह राजपूत – अंकिता लोखंडे

‘पवित्र रिश्ता’ मालिकेत एकत्र झळकल्यानंतर दोघांमध्ये प्रेम बहरलं. अनेक वर्ष एकमेकांना डेट केल्यानंतर दोघांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतला. चाहत्यांना दोघांच्या लग्नाची प्रतीक्षा देखील होती. पण दोघांच्या ब्रेकअपनंतर चाहत्यांना मोठा धक्का बसला. ब्रेकअपनंतर अंकिता हिच्या आयुष्यात उद्योजक विकी जैन याची एन्ट्री झाली. आता अभिनेत्री तिच्या वैवाहिक आयुष्यात आनंदी आहे.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;