माझा भाजप प्रवेश गणपती बाप्पाबरोबरच विसर्जित झाला – एकनाथ खडसे

माझा भाजप प्रवेश गणपती बाप्पाबरोबरच विसर्जित झाला – एकनाथ खडसे

देवेंद्र फडणवीस यांनी गणपती विसर्जनानंतर माझा प्रवेश होईल असे म्हटले होते, मात्र माझ्या दृष्टीने आता भाजप प्रवेश हा गणपती बाप्पाबरोबर विसर्जित झाला आहे, असे  सांगत एकनाथ खडसे यांनी आपण राष्ट्रवादीतच राहणार असल्याचे आज स्पष्ट केले.

मी राष्ट्रवादी कधीही सोडली नव्हती, मी भाजपमध्ये प्रवेश द्या असे कधीही म्हटले नव्हते. मला भाजपमधून या असं आमंत्रण होतं. हे आमंत्रण कसं होतं हे जयंत पाटील आणि शरद पवारांनाही माहीत आहे. मी आता राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये स्थायी सदस्य आहे आणि यापुढेही राष्ट्रवादीमध्ये सक्रिय काम करणार आहे. आगामी विधानसभा निवडणुकीत मी प्रचार करणार आहे, असे खडसे म्हणाले.

म्हणून महाजनांचा जामनेरमध्ये नंबर

जामनेर मतदारसंघ हा 35 वर्षांपूर्वी शिवसेनेचा होता. डॉ. मनोहर पाटील उमेदवार होते. त्यांच्या प्रचारासाठी मी येथे येत होतो. गिरीश महाजन सरपंच होते. त्या कालखंडात हा मतदारसंघ भाजपने बदलून घेतला म्हणून महाजनांचा नंबर लागला आणि आता ते माझ्या डोक्यावर बसलेत, असा टोला खडसे यांनी महाजन यांना लगावला.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;