बाप्पा पावला! ‘नवरा माझा नवसाचा-2’चा बॉक्स ऑफिसवर डंका

बाप्पा पावला! ‘नवरा माझा नवसाचा-2’चा बॉक्स ऑफिसवर डंका

नवरा माझा नवसाचा’ या गाजलेल्या मराठी चित्रपटाचा सिक्वेल तब्बल 19 वर्षांनी प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. शुक्रवारी प्रदर्शित झालेल्या ‘नवरा माझा नवसाचा-2’ने शुक्रवारी पहिल्याच दिवशी तब्बल 1 कोटी 86 लाख रुपयांचा गल्ला जमवला. चित्रपट व्यापार विश्लेषक तरण आदर्श यांनी सोशल मीडियावरून ही माहिती दिली. राष्ट्रीय चित्रपट दिनानिमित्त शुक्रवारी चित्रपटाचे तिकीट दर फक्त 99 रुपये असतानाही या चित्रपटाने घसघशीत कमाई केली. ‘नवरा माझा नवसाचा-2’मध्ये स्वप्नील जोशी-हेमल इंगळे ही जोडी सचिन-सुप्रिया पिळगांवकर यांची जावई, मुलगी अशा भूमिकेत दिसणार आहे. सासऱ्यांनी ज्याप्रमाणे धडपड करून नवस फेडला, तसा आता जावयाला फेडता येतो का, याची धमाल गोष्ट या चित्रपटात आहे. अभिनेते अशोक सराफ या चित्रपटात बस पंडक्टरऐवजी रेल्वे तिकीट निरीक्षकाच्या भूमिकेत आहेत. याशिवाय निर्मिती सावंत, वैभव मांगले, सिद्धार्थ जाधव, अली असगर, विजय पाटकर, जयवंत वाडकर यांच्याही चित्रपटात मुख्य भूमिका आहेत.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;