Reel बनवण्याच्या नादात प्राण गमवावे लागले, दुचाकीवर व्हिडीओ बनवताना मित्रांचा मृत्यू

Reel बनवण्याच्या नादात प्राण गमवावे लागले, दुचाकीवर व्हिडीओ बनवताना मित्रांचा मृत्यू

सोशल मीडियावर Reel बनवणाऱ्या तरुण तरुणींची संख्या लाखात आहे. व्हायरल होण्यासाठी कोणत्याही गोष्टीचा विचार न करता धोकादायक पद्धतीने व्हिडीओ बनवून सोशल मीडियावर अपलोड केले जातात. असाच एक व्हिडीओ बनवत असताना भयंकर अपघात होऊन दोन मित्रांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.

राजस्थानच्या अलवर जिल्ह्यामध्ये हा धक्कादायक प्रकार घडला आहे. निशांत आणि दीपक अशी या मित्रांची नावे असून हे दोघे बाईकवर उभे राहून स्टंट करत त्याचा व्हिडीओ बनवत होते. याच दरम्यान अचानक त्यांच्या बाईकची एका कारला जोदरार धडक झाली. या भयंकर अपघातात निशांतचा जागीच मृत्यू झाला तर दीपक सैनी याचा रुग्णालयात नेत असताना वाटेतच मृत्यू झाला.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दुचाकीवर उभे राहून रील बनवत असताना दुचाकीवरील त्यांचे नियंत्रन सुटले आणि त्यांची दुचाकी समोरून येणाऱ्या गाडीला धडकली. मृताच्या नातेवाईकांनी लेखी तक्रार दाखल केली आहे. त्या आधारे पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपासाला सुरुवात केली आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;