डीपी जळाली की इंजिनियरला हजार रुपये द्यायचे, तीन पिढ्यांपासून वीज बिल भरत नाही! मोदींच्या मंत्र्याने दिली वीजचोरीची जाहीर कबुली

डीपी जळाली की इंजिनियरला हजार रुपये द्यायचे, तीन पिढ्यांपासून वीज बिल भरत नाही! मोदींच्या मंत्र्याने दिली वीजचोरीची जाहीर कबुली

शेतातील पंपाचे वीज बिल आम्ही तीन पिढ्यांपासून भरलेले नाही. डीपी जळाली की इंजिनियरला एक हजार रुपये देऊन डीपी दुरुस्त करून घ्यायची, अशी वीजचोरीची जाहीर कबुली आज मिंधे गटाचे केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांनी दिली. केंद्रीय मंत्र्यांच्या या धक्कादायक विधानाने केंद्रातील मोदी-शाह सरकारच्या अब्रूचे धिंडवडे निघाले आहे.

रावेर लोकसभा मतदारसंघामध्ये तिसर्‍यांदा विजयाची हॅट्ट्रिक व केंद्रीय मंत्रिमंडळात निवड झालेल्या युवक कल्याण व क्रीडा मंत्रालयाच्या केंद्रीय राज्यमंत्री रक्षा निखिल खडसे आणि बुलढाणा जिल्ह्याचे खासदार तथा केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांचा आज शनिवार, २१ सप्टेंबर रोजी मलकापुरात जाहीर नागरी सत्कार करण्यात आला. या सत्काराला उत्तर देताना प्रतापराव जाधव यांनी हे धक्कादायक विधान केले.

या भाषणात प्रतापराव जाधव यांनी वीज बिल बुडविल्याची जाहीर कबुलीच दिली. महाराष्ट्र शासनाच्या विविध कल्याणकारी योजनांची माहिती देताना ते म्हणाले की, आता आम्ही शेतकर्‍यांचे वीज बिल माफ केले आहे. खरं सांगा शेतकर्‍यांनो आपण वीज बिल भरत होतो का? माझ्या शेतातील पंपाचे वीज बिल आम्ही गेल्या तीन पिढ्यांपासून भरलेले नाही. डीपी जळाली की इंजिनियरला एक हजार रुपये द्यायचे आणि डीपी दुरुस्त करून घ्यायची. यापुढे दिवसाही शेतकर्‍यांना वीज देणार असून, सौर ऊर्जांचे प्रकल्प मोठ्या प्रमाणात सुरु करण्यात आल्याचेही ते म्हणाले.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;