भव्यता, डायलॉग आणि नृत्याविष्कार…; प्राजक्ता माळीच्या ‘फुलवंती’ सिनेमाचा टीझर रिलीज

भव्यता, डायलॉग आणि नृत्याविष्कार…; प्राजक्ता माळीच्या ‘फुलवंती’ सिनेमाचा टीझर रिलीज

अभिनेत्री प्राजक्ता माळी सातत्याने वेगळ्या धाटणीच्या भूमिका साकारत असते. आतीही तिने नव्या सिनेमाची घोषणा केली आहे. ‘फुलवंती’ सिनेमाचा टीझर रिलीज झाला आहे. पद्मविभूषण बाबासाहेब पुरंदरे यांच्या लेखणीतून साकारलेली ‘फुलवंती’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या सिनेमाच्या टिझरने प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. ‘फुलवंती’ ही अलौकिक कलाकृती चित्रपटरुपात आपल्यासमोर 11 ऑक्टोबरला अवतरणार आहे. त्याआधी चित्रपटाचा देखणा टीझर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. या टिझरमधील भव्यता, डायलॉग आणि नृत्याने प्रेक्षकांना भूरळ पाडली आहे. नेटकऱ्यांनी कमेंट करत प्राजक्ताच्या या नव्या सिनेमाच्या टिझरचं कौतुक केलंय.

डायलॉगने वेधलं लक्ष

चित्रपटाचे अप्रतिम सेट्स, उच्च तांत्रिकमूल्ये, दमदार ऐतिहासिक व्यक्तिरेखा त्याला तेवढ्याच धारदार संवादाची सोबत अशा भव्यतेने येणारा ‘फुलवंती’ हा देखणा चित्रपट रसिकांसाठी मनोरंजनाची अपूर्व पर्वणी ठरणार आहे. या सिनेमाच्या टिझरमधील एक डायलॉग प्रेक्षकांना भावला आहे. ‘नाचात काहींना शौक दिसतो. तर काहींना कला… प्रश्न नजरेचा आहे… ती साफ असेल तर ‘फुलवंती’ पण तुम्हाला दुर्गाच दिसेल…’ हा प्राजक्ता माळीच्या तोंडी असणारा डायलॉग प्रेक्षकांना आवडला आहे. माझी खात्री आहे जसा पावनखिंड गाजला पिक्चर तसाच हा फुलवंती सिनेमा पण खूप गाजणार आहे. त्यात शंकाच नाही.. बघा तुम्हीच…, अशी कमेंट प्राजक्ता माळी हिच्या चाहत्याने केली आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Prajaktta Mali (@prajakta_official)

‘फुलवंती’ कधी रिलीज होणार?

पेशवाई काळातील ‘फुलवंती’ नावाची सुप्रसिद्ध नर्तिका आणि प्रकांडपंडीत व्यंकटशास्त्री यांची दमदार कथा असलेली आणि देखण्या कलाविष्काराने सजलेली फुलवंती मराठी सिनेसृष्टीतील भव्यदिव्य, अविस्मरणीय कलाकृती ठरेल. पॅनोरमा स्टुडिओज सादर करत आहेत… ‘फुलवंती’ मंगेश पवार अँड कंपनी आणि शिवोहम् क्रिएशन्स प्रायव्हेट लिमिटेड निर्मित ही भव्य कलाकृती 11 ऑक्टोबरला रसिकांच्या भेटीला येत आहे. या चित्रपटाचे संवाद लेखन प्रविण विठ्ठल तरडे यांनी केलं आहे. तर दिग्दर्शन स्नेहल प्रविण तरडे यांनी केलं आहे.

छत्रपतींनंतर मराठा साम्राज्याची धुरा पेशव्यांनी अतिशय समर्थपणे सांभाळली. त्यांच्या दरबारात एकापेक्षा एक धुरंदर होते. त्यातील एक म्हणजे सकल शास्त्रपारंगत व्यंकटध्वरी नरसिंह शास्त्री. श्रीमंतांच्या दरबारातील साक्षात बृहस्पती… अभिनेता गश्मीर महाजनी याने व्यंकटध्वरी नरसिंह शास्त्री यांची भूमिका साकारली आहे.व्यकंट शास्त्री यांचे व्यक्तिमत्व, त्यांची बुद्धिमत्ता आणि चारही दिशांना पसरलेली त्यांची किर्ती हे सर्व आपल्याला या ऐतिहासिकपटातून पाहायला मिळणार आहे.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;