‘D’CM….डरपोक सीएम मिंधे; आदित्य ठाकरे यांचा सिनेट निवडणुकीवरून घणाघात

‘D’CM….डरपोक सीएम मिंधे; आदित्य ठाकरे यांचा सिनेट निवडणुकीवरून घणाघात

मुंबई विद्यापीठाची सिनेट निवडणूक ऐनवेळी स्थगित केल्यामुळे युवासेनेने उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. दुसरीकडे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, युवासेनाप्रमुख, आमदार आदित्य ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेत मिंधे सरकारवर घणाघात केला. आज स्पष्ट झाले की एवढे भित्रे, गद्दार मुख्यमंत्री महाराष्ट्राने कधीच पाहिले नाही. डरपोक सीएम मिंधे… या सीएमनेही ‘डी’सीएम लावायला पाहिजे, असा हल्लाही आदित्य ठाकरे यांनी चढवला.

सिनेटची निवडणूक गतवर्षी ऑगस्ट महिन्यात व्हायला हवी होती. मात्र ही निवडणूक तीन वेळा रद्द करण्यात आली. यावेळी 22 सप्टेंबरला होईल असे न्यायालयाच्या निर्णयात ठरले होते. पण शुक्रवारी रात्री मुंबई विद्यापीठाने पत्रक काढत ही निवडणूक शासनाकडून पुढील आदेश प्राप्त होईपर्यंत स्थगित करण्यात येत आहे, असे सांगितले. 2015 ची निवडणूकही 2018 मध्ये झाली होती. तेव्हा युवासेनेने 10 पैकी 10 जागा जिंकल्या होत्या, असेही आदित्य ठाकरे म्हणाले.

मिंधे-भाजप सरकारचा हस्तक्षेप वाढत असून आजूबाजूच्या दोन-तीन हाऊसिंग सोसायटीच्या निवडणुकाही स्थगित केल्या आहेत. शिवसेनेचा, युवासेनेचा विजय होईल अशी भीती त्यांच्या मनात बसली आहे. विधानसभेआधी कुठलीही निवडणूक होऊ द्यायची नाही, असे त्यांच्या मनात आहे. त्यामुळे सीएमच्या पुढे डी लावावा लागेल. डरपोक सीएम मिंधे, असा टोलाही आदित्य ठाकरे यांनी लगावला.

लोकसभा निवडणुकीवेळी पुणे आणि चंद्रपूरमधील पोटनिवडणूक होऊ दिली नाही. गेल्या दोन-अडीच वर्षात स्थानिक स्वराज्य संस्थेची निवडणूक झालेली नाही. मुंबई विद्यापीठातही हरतील ही भीती त्यांच्या मनात बसलेली आहे, त्यामुळे ही निवडणूकही घेत नाहीत. आमचे 10 उमेदवार सरकार पाडू शकत नाही. नगरसेवक, आमदाराचे काम करू शकत नाहीत. मुंबई विद्यापीठाची सिनेट भरते तेव्हा विद्यार्थ्यांचे, शिक्षकांचे, कर्मचाऱ्यांचे विषय मांडून त्यांना न्याय मिळवून देणे हे त्यांचे काम आहे. पण ही निवडणूकही होऊ दिली जात नाही. न्यायालयाच्या निर्णयाचाच हा अवमान असून न्यायालयाने कुलगुरुंवर कारवाई केली पाहिजे. आमचे सरकार आल्यावर कुलगुरुंवर सखोल चौकशी लावून पुढची कारवाई करू, असेही आदित्य ठाकरे म्हणाले.

वन नेशन, वन इलेक्शन म्हणणारे दोन राज्यात निवडणुका एकत्र घेऊ शकत नाहीत. एका कॉलेजची निवडणूकही हे घेऊ शकत नाहीत, ही कुठली लोकशाही आहे? असा सवाल करत याच लोकशाही आणि संविधानासाठी आमची लढाई असल्याचे आदित्य ठाकरे म्हणाले. मुंबई विद्यापीठ, मिंधे-भाजप तरुणांच्या, सुशिक्षित मतदारांना घाबरते. एका बाजूला शेतकरी हैराण आहेत, दुसरीकडे महिलांवर अत्याचार वाढताहेत, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकाही घेत नाहीत. यामुळे लोकांना सरकार बदलायचे असून विधानसभा निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीचे सरकार बहुमताने आणावे लागेल, असेही आदित्य ठाकरे यावेळी म्हणाले.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;