वर्षा उसगांवकर यांच्यासोबत मोठा घात, अभिनेत्रीने अनेक प्रयत्न करूनही…

वर्षा उसगांवकर यांच्यासोबत मोठा घात, अभिनेत्रीने अनेक प्रयत्न करूनही…

बिग बॉस मराठी सीजन 5 मध्ये मोठा हंगामा बघायला मिळतोय. विशेष म्हणजे हे सीजन धमाल करत आहे. या सीजनची चाहत्यांमध्ये मोठी क्रेझ देखील बघायला मिळतंय. अनेक दिग्गज कलाकार या सीजनमध्ये सहभागी झाले. पहिल्यांदाच बिग बॉस मराठीला होस्ट करताना रितेश देशमुख दिसतोय. लोकांना रितेश देशमुखची खास स्टाईल आवडताना देखील दिसत आहे. या सीजनकडून नक्कीच मोठ्या अपेक्षा बघायला मिळत आहेत. वैभव हा बिग बॉसच्या घराबाहेर पडल्यानंतर सर्वांनाच मोठा धक्का बसला. आता बिग बॉसने घरातील अनेक नियम हे बदलले आहेत.

नुकताच बिग बॉसच्या घरात कॅप्टनशीचा टास्क हा पार पडलाय. यावेळी घरातील सदस्य धमाकेदार गेम कॅप्टन होण्यासाठी खेळताना दिसले. अरबाज पटेल हा परत एकदा बिग बॉसच्या घराचा कॅप्टन बनलाय. विशेष म्हणजे यावेळी त्याला निकी तांबोळी आणि जान्हवी किल्लेकर यांनी सपोर्ट केला. यावेळी वर्षा उसगांवकर यांना त्यांच्या टीमने धोका दिल्याचे बघायला मिळाले. अंकिता, पॅडी कांबळे, अभिजीत सावंत, सुरज, धनंजय पोवार आणि वर्षा उसगांवकर हे एकाच टीममधील सदस्य आहेत.

सुरूवातीच्या काळापासून हे सर्वजण एकत्र गेम खेळताना दिसले. मात्र, आता या टीममधून वर्षा उसगांवकर या बाहेर पडल्याचे स्पष्ट दिसत आहे. कॅप्टनसीच्या टास्कमध्ये यांनी कोणीही वर्षा उसगांवकर यांची साथ दिली नाही. टास्कमध्ये वर्षा उसगांवकर यांच्याकडून कोणीही पाण्याची खरेदी केली नाही. यामुळे यांच्यातील वाद आता पुढे आलाय. हेच नाही तर अंकिता हिच्याकडून स्पष्ट करण्यात आले की, मी मुद्दाम वर्षा ताईंचे पाणी घेतले नाही.

कारण त्यांनी अगोदरच काही योजना तयार केली. आता त्यांना काहीही वाटो आणि काहीही दिसो आता असेच वागायचे. टास्कमध्येच अभिजीत आणि पॅडी कांबळे हे वर्षा उसगांवकर यांच्याकडे बोलण्यास जातात. यावेळी वर्षा उसगांवकर आपली बाजू समजून सांगताना दिसतात. मात्र, त्यांच्याच टीममधील सदस्य त्यांचे काहीच ऐकत नसल्याचे बघायला मिळाले.

सध्या वर्षा उसगांवकर आणि निकी तांबोळी यांचे बिग बॉसच्या घरात चांगले जमताना दिसत आहे. पुढील काही दिवसांमध्ये बिग बॉसच्या घरात नक्कीच नवीन काही समीकरणे देखील बघायला मिळू शकतात. वर्षा उसगांवकर यांना त्यांच्याच टीममधील सदस्यांनी धोका दिल्याने त्या कॅप्टनसी पदापासून दूर राहिल्या.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;