Nagar accident news – जखमींना रुग्णालयात नेताना रुग्णवाहिकेचा अपघात; तीन ठार, दोघे जखमी

Nagar accident news – जखमींना रुग्णालयात नेताना रुग्णवाहिकेचा अपघात; तीन ठार, दोघे जखमी

नगर जिल्ह्यातील श्रीगोंदा तालुक्यामध्ये शुक्रवारी रात्री झालेल्या दोन वेगवेगळ्या अपघातामध्ये तीन जण ठार झाले, तर दोघे जखमी झाले. विकास दादा वाकळे, गणेश छबू वाकळे आणि लक्ष्मण नारायण भेसर अशी मृतांची, तर अक्षय गायकवाड आणि दादा रामा भेस अशी जखमींची नावे आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, रात्री साडे दहा वाजता विकास, गणेश आणि लक्ष्मण हे बुलेटवरून (क्र. एमएच 03 बीयू 6516) पेट्रोल पंपाकडे जात होते. याचवेळी त्यांची गाडी घसरली आणि नदीत पडली. यात ते जखमी झाले. जखमींना रुग्णालयात नेण्यासाठी एक रुग्णवाहिका बोलावण्यात आली. विकास आणि गणेशला श्रीगोंदा येथील मेडिकेअर रुग्णालयात दाखल केले, तर लक्ष्मण आणि त्यांचा पुतण्या रामा यांना रुग्णालयात नेताना रुग्णवाहिका (क्र. एमएच 09 बीसी 1784) आणि फोड फिगो कार (क्र. एमएच 39 जे 9252) यांच्यात समोरासमोर धडक झाली.

यात लक्ष्मण भेसर जागीच ठार झाला, तर रुग्णवाहिका चालक अक्षय गायकवाड आणि दादा भेसर जखमी झाले. अपघातानंतर फोर्डचा चालक, राजापूर-माठ गावाचे कामगार तलाठी विजय मोरे घटनास्थळावरून पसार झाले. तर दुसरीकडे मेडिकेअर रुग्णालयात नेलेल्या विकास आणि गणेश या वाकळे (रा. पारगाव) बंधुंचाही उपचारांपूर्वीच मृत्यू झाला. त्यामुळे गावावर शोककळा पसरली आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;