‘हे असं दाखवायचं…’, आजारी वडिलांची सेवा करुनही प्रसिद्ध अभिनेत्री का होतेय ट्रोल?
आई-वडिलांची सेवा करणं ही चांगली बाब आहे. पण प्रसिद्ध अभिनेत्री वडिलांची सेवा करुनही ट्रोल होतेय. यामागे काय कारण आहे? टीव्ही अभिनेत्री माही विजचे वडिल आजारी आहेत. त्यामुळे माही सध्या स्ट्रेसमध्ये आहे.
वडिलांना डॉक्टरांनी बेड रेस्ट सांगितली आहे. या परिस्थितीत माही आपल्या वडिलांची काळजी घेत आहे. त्यांना आंघोळ घालणं, मालिश करण्यापासून त्यांची नख कापणं ही सर्व काम करत आहे.
माही विजने वडिलांची सेवा करतानाचा व्हिडिओ इन्स्टाग्रामवर शेयर केला. मागचे 10 दिवस किती कठीण होते, ते तिने सांगितलं. अभिनेत्रीचा हा व्हिडिओ बघितल्यानंतर अनेकांनी तिला ट्रोल करायला सुरुवात केली.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.




Comment List