रोहित शर्मा आणि करीना कपूर यांच्यामधील खास कनेक्शन, भावना व्यक्त करत क्रिकेटर म्हणाला…

रोहित शर्मा आणि करीना कपूर यांच्यामधील खास कनेक्शन, भावना व्यक्त करत क्रिकेटर म्हणाला…

Happy Birthday Kareena Kapoor: अभिनेत्री करीना कपूर हिला आज कोणत्या ओळखीची गरज नाही. अनेक सिनेमांमध्ये मुख्य भूमिका साकारत करीना हिने चाहत्यांचं मनोरंजन केलं. आज वयाच्या 43 व्या वर्षी देखील करीना कपूर हिची चाहत्यांमध्ये असलेली क्रेझ कमी झालेली नाही. बॉलिवूडमध्ये करियर करत असताना करीना फत्त तिच्या प्रोफेशनल आयुष्यामुळेच नाही तर, खासगी आयुष्यामुळे देखील तुफान चर्चेत राहिली. आज करीना तिच्या वैवाहिक आयुष्यात आनंदी आहे, पण अनेक प्रसिद्ध अणि लोकप्रिय सेलिब्रिटींसोबत करीनाच्या नावाची चर्चा रंगली. तर अनेकांनी करीना बद्दल मनात असलेली भावना व्यक्त केली.

करीना हिच्याबद्दल भावना व्यक्त करणाऱ्यांची संख्या देखील फार मोठी आहे. या यादीमध्ये भारतीय क्रिकेट संघाचा कॅप्टन रोहित शर्मा याचा देखील समावेश आहे. एका मुलाखतीत रोहित शर्मा याने करीनाबद्दल भावना व्यक्त केल्या. सांगायचं झालं तर, आज करीना हिचा वाढदिवस असल्यामुळे तिच्या खासगी आणि प्रोफेशनल आयुष्याची चर्चा रंगली आहे.

आज अभिनेत्री आणि क्रिकेटर त्यांच्या आयुष्यात पुढे गेले आहेत. पण तरी देखील रिलेशनशिपच्या चर्चा चाहत्यांमध्ये रंगलेल्या असतात. एक काळ असा होता जेव्हा रोहित शर्मा एका बॉलिवूड अभिनेत्री करीना कपूर हिच्यावर फिदा होता. याचा खुलासा खुद्द अभिनेत्याने केला आहे.

2014 मध्ये दिलेल्या एका मुलाखतीत रोहित शर्मा याने बॉलिवूडसोबत असलेल्या नात्याबद्दल सांगितलं आहे. रोहित शर्मा म्हणाला होता, ‘मी मधुबाला, वहीदा रहमान, किशोर कुमार, राजेश खन्ना आणि अमिताभ बच्चन यांचे सिनेमा पाहात मोठा झालो आहे.’ यावेळी रोहित याला आवडती अभिनेत्री कोण असा प्रश्न देखील विचारण्यात आला. तेव्हा रोहित याने अभिनेत्री करीना कपूर हिचं नाव घेतलं.

करीना कपूर हिच्याबद्दल रोहित म्हणाला, ‘मला करीना कपूर आवडते. मी तिच्यासाठी वेडा होतो. मी तिचा प्रत्येक सिनेमा पाहिला आहे. तेव्हा करीना माझी क्रश होती..’ असं देखील रोहित शर्मा म्हणाला होता. रोहित बद्दल ही गोष्ट फार कमी लोकांना माहिती आहे.

करीना कपूर आणि सैफ अली खान

अनेक वर्ष एकमेकांना डेट केल्यानंतर करीना कपूर आणि सैफ अली खान यांनी लग्न केलं. आज करीना कपूर आणि सैफ अली खान एकमेकांसोबत आनंदी वैवाहिक आयुष्य जगत आहेत. करीना – सैफ यांच्या मोठ्या मुलाचं नाव तैमूर आणि लहान मुलाचं नाव जेह असं आहे. करीना कायम मुलांसोबत फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट करत असते.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;