तिकिटासाठी मिंधे गटात 20 कोटींचा रेट, शिंदे दोन नंबरचे धंदे करणाऱ्यांचे मुख्यमंत्री; लक्ष्मण हाकेंचा जोरदार हल्ला

तिकिटासाठी मिंधे गटात 20 कोटींचा रेट, शिंदे दोन नंबरचे धंदे करणाऱ्यांचे मुख्यमंत्री; लक्ष्मण हाकेंचा जोरदार हल्ला

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे असोत की आणि कुणी यांना फक्त महाराष्ट्र ओरबाडून खायचा आहे. सत्तेमधून पैसा आणि पैशामधून सत्ता… टेंडरवाले आणि दोन नंबरचे बोगस धंदे करणाऱ्यांचे संरक्षण करणाऱ्यांचे एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री आहेत. मिंधे गटात निवडणुकीच्या तिकिटासाठी 20 कोटी मागतात, असा जोरदार हल्ला ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी मिंधे सरकारवर आज चढवला. आरक्षण म्हणजे गरीबी हटाव नाही हे संविधानाला अपेक्षित नाही, असे लक्ष्मण हाके म्हणाले.

ओबीसी संपविण्याचे सरकारचे धोरण

मराठा तेवढाच मेळवावा आणि ओबीसी संपवावा हे या मुख्यमंत्र्यांचे धोरण आहे, म्हणून आम्हाला उपोषणाला बसाव लागतंय. ओबीसी हे शब्द एकनाथ शिंदे यांच्या तोंडून कधी येत नाही याची आम्हाला लाज वाटते. महाराष्ट्रातल्या 12 कोटी जनतेच्या दायीत्वाची शपथ घेतली आहे आणि तुम्ही हैद्राबाद गॅझेट लावायला निघालात. काय आहे त्या गॅझेटमध्ये  या प्रश्नांची उत्तरे आम्हाला हवी आहेत, असे हाके म्हणाले.

मिंधे उमेदवारीसाठी 20-20 कोटी मागतात

यांना फक्त गर्दी करून मेळाव्याला जायला, झेंडे आणि गर्दी जमवायला लोक हवेत. पण निवडणुका आल्यावर आमदार-खासदारकी द्यायची वेळ आली की तुमच्याकडे पैसे आहेत का?, असे विचारतात. उमेदवारीसाठी 20-20 कोटी रुपये मागितले जातात. वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांचे हे विचार होते का?, अशा शब्दात मिंधे गटाच्या नेत्यांचा लक्ष्मण हाके यांनी समाचार घेतला.

ओबीसी संपविण्याचे सरकारचे धोरण

मराठा तेवढाच मेळवावा आणि ओबीसी संपवावा हे या मुख्यमंत्र्यांचे धोरण आहे, म्हणून आम्हाला उपोषणाला बसावं लागतंय. ओबीसी हे शब्द एकनाथ शिंदे यांच्या तोंडून कधी येत नाही याची आम्हाला लाज वाटते. महाराष्ट्रातल्या 12 कोटी जनतेच्या दायित्वाची शपथ घेतली आहे आणि तुम्ही हैदराबाद गॅझेट लावायला निघालात. काय आहे त्या गॅझेटमध्ये या प्रश्नांची उत्तरे आम्हाला हवी आहेत, असे हाके म्हणाले.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;