नांदेडात भाजपकडून फाटक्या साडय़ांचे वाटप, लाडक्या बहिणींनी दिले शिव्याशाप

नांदेडात भाजपकडून फाटक्या साडय़ांचे वाटप, लाडक्या बहिणींनी दिले शिव्याशाप

तामसा येथे साडी वाटपात झालेल्या गोंधळावर पांघरूण घालता घालता भाजपच्या तोंडाला फेस आला आहे. त्यातच भर म्हणून हिमायतनगरमध्येही भाजपने फाटक्या साडय़ा वाटल्याने महिलांच्या संतापाचा कडेलोट झाला. लाडक्या बहिणींनी भाजपला शिव्याशाप देत फाटक्या साडय़ा तेथेच टाकून दिल्या.

गेल्या आठवडय़ातच तामसा येथे भाजपकडून ‘लाडक्या बहिणीचा देवाभाऊ’ कार्यक्रमात साडय़ा वाटप करण्यात येणार असल्याचे जाहीर करण्यात आले होते. साडय़ा वाटण्यात येणार असल्याने महिलांची प्रचंड गर्दी झाली. महिलांनी एकमेकांना ढकलून दिले. नियोजन हुकल्याने महिलांनी अक्षरशः साडय़ा लुटल्या.

हिमायतनगर येथेही भाजपच्या साडी वाटप कार्यक्रमाला महिलांची तुफान गर्दी जमवण्यात आली. परंतु येथेही नियोजनाचे बारा वाजले. साडय़ा ठेवलेल्या ठिकाणी महिलांनी हल्लाबोल केला. साडय़ा लुटल्या. मात्र या साडय़ा फाटक्या निघाल्या. त्यामुळे संतापलेल्या देवाभाऊंच्या बहिणींनी साडय़ा तेथेच फेकून दिल्या.

z साडी घेण्यासाठी आलेल्या महिलांना चहा, नाश्ता देण्याचे आश्वासन देण्यात आले होते. परंतु सकाळी आठ वाजेपासून आलेल्या महिलांना पाण्याचा थेंबही मिळाला नाही. महिलांची वाढती गर्दी पाहून भाजपचे पदाधिकारी पळून गेले. साडय़ा द्यायच्याच नव्हत्या तर आम्हाला बोलावले कशाला असा सवाल करत भाजपला शिव्याशाप देत महिला निघून गेल्या.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;