भगदाड पडलेल्या रस्त्यावर वृक्षारोपण , प्रभादेवी येथे शिवसेनेकडून अनोख्या पद्धतीने निषेध

भगदाड पडलेल्या रस्त्यावर वृक्षारोपण , प्रभादेवी येथे शिवसेनेकडून अनोख्या पद्धतीने निषेध

ऐन गणेशोत्सवात प्रभादेवी नाका येथील वीर सावरकर मार्ग येथील रस्त्याला भगदाड पडल्याची घटना घडली होती. त्याच ठिकाणी पुन्हा हा रस्ता खचला आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेनेतर्फे भगदाड पडलेल्या रस्त्यावर वृक्षारोपण करून अनोख्या पद्धतीने पालिकेचा निषेध करण्यात आला.

गणेशोत्सवाच्या काळात प्रभादेवी नाक्यावर ज्या ठिकाणी रस्ता खचला होता त्याच ठिकाणी पुन्हा रस्ता खचला आहे. भिकू बिल्डिंग येथील रहिवासी ऋषिकेश कोरगावकर तसेच वरळी-कोळीवाडा जनता कॉलनी येथील शिवसैनिक जयेंद्र चव्हाण यांनी ही बाब शाखा क्रमांक 193 चे शाखाप्रमुख संजय भगत यांच्या निदर्शनास आणून दिली. शाखाप्रमुख संजय भगत यांनी तातडीने विभागप्रमुख महेश सावंत, सूर्यकांत बिर्जे विनायक देवरुखकर, शैलेश माळी, नितीन भुवड तसेच तन्मय विलनकर यांच्यासह खचलेल्या रस्त्यात वृक्षारोपण करून अनोख्या पद्धतीने निषेध नोंदवला. पालिका प्रशासन मुंबईकरांना आणि या रस्त्यांना कधी गांभीर्याने घेणार असा प्रश्न नागरिकांना पडला आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;