धार्मिक तेढ निर्माण करणाऱ्या नितेश राणेंवर कारवाई करा, अजितदादांच्या आमदाराचे फडणवीसांना पत्र

धार्मिक तेढ निर्माण करणाऱ्या नितेश राणेंवर कारवाई करा, अजितदादांच्या आमदाराचे फडणवीसांना पत्र

काल बुलढाण्यात वैतागलेल्या अजितदादांनी वाचाळवीरांना आवर घालण्याची मागणी केली होती. आता त्यांच्या गटाचे आमदार सतीश चव्हाण यांनी थेट गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांना पत्र लिहून राज्यात धार्मिक तेढ निर्माण करणारे भाजप आमदार नितेश राणे यांच्यावर तात्काळ कारवाई करण्याची मागणी केली आहे.

राणे हे त्यांच्या सभांमधून सातत्याने मुस्लिम समाजाबद्दल अत्यंत आक्षेपार्ह विधाने करत आहेत. यामुळे मुस्लिम समाजात संतापाची भावना आहे. राणे यांच्या वक्तव्याची चौकशी करून त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी आमदार सतीश चव्हाण यांनी पत्रात केली आहे. राणे यांच्या वादग्रस्त विधानांमुळे सामाजिक तेढ निर्माण होण्याची भीतीही आमदार सतीश चव्हाण यांनी व्यक्त केली आहे.

z वेडेवाकडे बोलून महायुतीच्या सरकारला संकटात आणू नका, असे खडे बोल अजित पवारांनी सुनावले होते. त्यांचा रोख मिंधे गटाचे आमदार संजय गायकवाड, भाजपचे खासदार अनिल बोंडे आणि आमदार नितेश राणे यांच्याकडे होता.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;