पुण्यात ‘विकास’ खचला… अख्खा ट्रक खड्डय़ात गेला!

पुण्यात ‘विकास’ खचला… अख्खा ट्रक खड्डय़ात गेला!

भाजपची सत्ता असलेल्या पुण्यात विकास खचला आहे. शहरात मोठय़ा प्रमाणावर झालेल्या पावसामुळे ठिकठिकाणी रस्त्यांची चाळण झाली असून शहराच्या मध्यवर्ती भागात समाधान चौक सिटी पोस्ट आवारातील रस्त्याने चक्क संपूर्ण ट्रकच गिळंकृत केल्याची घटना घडली. पेव्हर ब्लॉकचा रस्ताच खचून ट्रक थेट खड्डय़ामध्ये कोसळल्यामुळे परिसरात घबराट उडाली होती. प्रसंगावधान राखून चालकाने ट्रकमधून उडी मारल्यामुळे त्याचा जीव वाचला आहे.

अग्निशमन दलाने दिलेल्या माहितीनुसार, लक्ष्मी रस्त्यावरील समाधान चौकानजीक असलेल्या सिटी पोस्ट आवारात  महापालिकेची मैलापाणी वाहिनी दुरुस्ती करण्यासाठी ट्रकचालक जात होता. त्याच वेळी अचानकपणे ट्रक 25 फूट खड्डय़ात पडला. सुदैवाने या घटनेत जीवितहानी झालेली नसून चालकाने उडी मारल्याने तो बचावला आहे. दरम्यान, भलामोठा खड्डा नेमका कशामुळे पडला याची माहिती उपलब्ध झाली नाही. सिटी पोस्ट कार्यालय परिसरात मैलापाणी वाहिन्यांबाबत तक्रारी आल्याने महापालिकेकडून संबंधित वाहिन्या दुरुस्तीचे काम करण्यासाठी मैलापाणी वाहिनी दुरुस्ती ट्रक चालकाला पाठविण्यात आले होते.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;