ऐश्वर्यामुळे सलमान माझा होऊ शकला नाही, अभिनेत्रीचा धक्कादायक आरोप

ऐश्वर्यामुळे सलमान माझा होऊ शकला नाही, अभिनेत्रीचा धक्कादायक आरोप

Salman and aishwarya : बॉलिवूडचा सुपरस्टार सलमान खान आणि अभिनेत्री ऐश्वर्या राय यांचे नाते सगळ्यांनाच माहित आहे. दोघांची सुरु झालेली प्रेम कहाणी जास्त काळ टिकू शकली नाही. त्यांच्या ब्रेकअपने त्यांच्या चाहत्यांची देखील निराशा झाली होती. सलमान खानच्या लव्ह लाइफचा जेव्हा ही उल्लेख होतो तेव्हा लोकं ऐश्वर्याचं नाव घेतात. पण ऐश्वर्यापूर्वी सलमानच्या आयुष्यात आणखी एक व्यक्ती होती. सलमान खानला तिच्यासोबत लग्न करायचे होते. दोघांनी लग्नाची योजनाही आखली होती. पण ते लग्न होऊ शकले नाही. सलमान जिच्या प्रेमात पडला होता ती अभिनेत्री होती सोमी अली. जी सलमानची गर्लफ्रेंड होती. सोमी अली हिने सलमान खान सोबतच्या नात्याबद्दल अनेक दावे केले आहेत. टाइम्स नाऊला दिलेल्या मुलाखतीत तिने सांगितले की, ऐश्वर्या रायमुळे दोघांचे ब्रेकअप झाले.

सोमी अलीने सांगितले की, जेव्हा संजय लीला भन्साळीच्या ‘हम दिल दे चुके सनम’ चित्रपटाचे शूटिंग सुरू होते, तेव्हा ऐश्वर्या आणि सलमानची जवळीक वाढली होती. एके दिवशी तिने शूटिंग करत असताना सलमानला फोन केला होता. पण त्याने फोन उचलला नाही. त्यानंतर सोमीने भन्साळींना फोन केला, त्यांनी फोन उचलला आणि सलमानचे शूटिंग सुरू असल्याचे सांगितले. सोमीला हे समजले नाही आणि ती म्हणाली, “जर तो शॉटमध्ये आहे तर ते दिग्दर्शन का करत नाहीयेत, त्यांनी माझा फोन कसा उचलला?”

सोमी म्हणाली की, भन्साळींनी तिला जे सांगितले ते तिच्या समजण्याच्या पलीकडे होते. ते बोलताना अडखळत होते. त्यांना काय बोलावे ते कळत नव्हते आणि नंतर ऐश्वर्या राय सलमानच्या जिममध्ये येऊ लागली. जिथे आम्ही राहत होतो. सलमान आणि मी गॅलेक्सीच्या तळमजल्यावर राहायचो, जिथे आमची जिम देखील होती.

सोमी अलीने सांगितले की, ‘हम दिल दे चुके सनम’ दरम्यान सलमान आणि ऐश्वर्या यांच्यातील नात्याबद्दल तिला कळले. इतर लोकं तिला सगळी माहिती द्यायचे. आता सलमानच्या आयुष्यातून निघून जाण्याची वेळ आली आहे हे सोमीला समजू लागले होते.

सलमान खान आणि सोमी अली यांच्यातील नाते 1991 मध्ये सुरु झाले आणि 1999 मध्ये आलेल्या ‘हम दिल दे चुके सनम’ चित्रपटादरम्यान संपले. हा तो काळ होता जेव्हा सलमान आणि ऐश्वर्या एकमेकांच्या प्रेमात पडले होते. पण त्यांचे नातेही फार काळ टिकले नाही आणि 2002 मध्ये त्यांचे ब्रेकअप झाले.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;