भाजप – मिंधे निवडणुकांना घाबरतात! मुंबई विद्यापीठाच्या निवडणुका पुढे ढकलण्यावरून आदित्य ठाकरेंचा निशाणा

भाजप – मिंधे निवडणुकांना घाबरतात! मुंबई विद्यापीठाच्या निवडणुका पुढे ढकलण्यावरून आदित्य ठाकरेंचा निशाणा

राज्य सरकारने विद्यापाठीची सिनेट निवडणूक ऐनवेळी स्थगित केली आहे. त्यामुळे भाजप आणि मिंधे कसे घाबरले असा घणाघात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे आमदार, युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांनी केला आहे. आणि हेच लोक एक देश एक निवडणुकीच्या बाता मारतात असेही आदित्य ठाकरे म्हणाले.

सोशल मीडिया एक्सवर पोस्ट करून आदित्य ठाकरे म्हणाले की, मुंबई विद्यापीठाच्या पदवीधर निवडणूक रद्द करण्यात आली आहे. त्यामुळे भाजप आणि घटनाबाह्य मुख्यमंत्री मिंधे हे युवासेनेला किती घाबरत आहेत हे दिसून येत आहे.

तसेच मिंधेंची गद्दार गँग इतकी घाबरली आहे की मतदानाच्या आदल्या दिवशई त्यांनी मुंबई विद्यापीठाची सिनेट निवडणूक रद्द केली आहे. हेच लोक एक देश एक निवडणुकीच्या बाता मारतात. ही लाजिरवाणी बाब आहे. निवडणूक रद्द करणारे हे लोक भित्रे आहेत असेही आदित्य ठाकरे म्हणाले.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;