लग्नाच्या तीन वर्षांनंतर प्रेग्नंट झाली अभिनेत्री, ढसाढसा रडली, पतीच्या डोळ्यांतूनही अश्रू आणि…

लग्नाच्या तीन वर्षांनंतर प्रेग्नंट झाली अभिनेत्री, ढसाढसा रडली, पतीच्या डोळ्यांतूनही अश्रू आणि…

नुकताच अभिनेत्री सना सैयद हिने मोठा खुलासा केलाय. सना सैयद हिने मोठा काळ अभिनय क्षेत्रामध्ये गाजवला आहे. सना सैयदची जबरदस्त अशी फॅन फॉलोइंग बघायला मिळते. विशेष म्हणजे सना सैयद ही लवकरच आता बाळाला जन्म देणार आहे. लग्नाच्या तीन वर्षांनंतर सना सैयद ही प्रेग्नंट झाली. त्यावेळी नेमके काय घडले हे सांगताना आता सना सैयद ही दिसली आहे. सना सैयद हिच्याकडून पहिल्यांदाच तिच्या खासगी आयुष्याबद्दल खुलासा करण्यात आलाय. आता अभिनेत्रीच्या विधानाची जोरदार चर्चा ही रंगताना दिसत आहे. सना सैयद हिने मुलाखतीमध्ये तिच्या खासगी आयुष्याबद्दल खुलासा केलाय.

सना सैयद म्हणाली की, मला सुरूवातीला माहिती नव्हते की, काय करायचे आहे. मी माझ्या हातामध्ये प्रेग्नंसी किट घेऊन बसले होते. माझ्या पतीची सवय आहे की, तो जसा ही घरी येतो तसे माझा हात धरून बसतो. त्यादिवशीही तो जसा ही घरी आला तसा त्याने माझा हात पकडला. त्याने बघितले की, माझा रिपोर्ट पॉझिटिव्ह आहे.

त्यानंतर मी खूप जास्त रडत होते. हेच नाही तर माझ्यासोबत तो देखील खूप रडत होता. आम्ही दोघे रडत रडत हसत देखील होतो. माझी आई आणि सासू दोघीही खूप जास्त भावूक झाल्या. मला फक्त एक हेल्दी बेबी हवा होता. माझ्या पतीला वाटते की, मुलगी होईल आणि माझ्या आईला वाटते की, मुलगा होईल.

पुढे सना म्हणाली की, आराम करण्यासाठी मला ब्रेक घेणे आवश्यक होते. मुळात म्हणजे माझी प्रेग्नंसी नॉर्मल आहे. परंतू, प्रेग्नंसीच्या सुरूवातीच्या काळात काही समस्या होत्या. यामुळेच डॉक्टरांनी मला जड वस्तू, डान्स आणि पायऱ्या उतरण्यास मनाई केली. मी प्रेग्नंसीच्या चार महिन्यांनंतरच ब्रेक घेतला. या दिवसांमध्ये ब्रेक घेऊन आरामात करणे अधिक महत्वाचे आहे.

बाळाला जन्म दिल्यानंतरही मी काही काळ ब्रेकवर असेल आणि त्यानंतर मी परत कामाला सुरूवात करेल. बाळाला जन्म दिल्यानंतर मला चांगली ऑफर मिळाली तर मी नक्कीच त्याचा विचार करेल, असेही सना सैयद हिने म्हटले आहे. सना सैयदला आठ महिने पूर्ण झाले आहेत. पुढच्या महिन्यात ती आपल्या बाळाला जन्म देईल.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;