मनोज जरांगे यांची तब्येत खालावली, रक्तदाब कमी; साखरेचे प्रमाणही घटले

मनोज जरांगे यांची तब्येत खालावली, रक्तदाब कमी; साखरेचे प्रमाणही घटले

उपोषणाच्या तिसऱ्या दिवशी मनोज जरांगे-पाटील यांची प्रकृती खालावली आहे. जरांगे यांचा रक्तदाब कमी झाला असून साखरेचे प्रमाणही घटले आहे. वैद्यकीय पथकाने तपासणी करून जरांगे यांना उपचार घेण्याची विनंती केली. परंतु जरांगे यांनी उपचार घेण्यास नकार दिला.

तालुका आरोग्य अधिकारी डॉ. अनिल वाघमारे यांनी जरांगे यांच्या प्रकृतीची तपासणी केली. त्यात त्यांचा रक्तदाब आणि रक्तातील साखरेचे प्रमाण घटल्याचे आढळून आले. दरम्यान, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे पणतू राजरत्न आंबेडकर यांनी आज मनोज जरांगे यांची भेट घेतली. जरांगे यांची प्रकृती खालावल्याचे पाहून त्यांना अश्रू अनावर झाले. या वेळी बोलताना त्यांनी मनोज जरांगे यांच्या केसालाही धक्का लागला तर महाराष्ट्र सहन करणार नाही, असा इशारा दिला.

ओबीसींचे आरक्षण वाचवण्यासाठी वडीगोद्रीत दोन ठिकाणी उपोषण सुरू झाले आहे. प्रा. लक्ष्मण हाके हे वडीगोद्रीत उपोषणाला बसले असून मनोज ससाणे हे आपल्या सहकाऱ्यांसह आंतरवालीच्या वेशीवर उपोषण करत आहेत. सरकारने सगेसोयऱ्यांच्या अध्यादेशाची अंमलबजावणी करू नये, असा इशारा मनोज ससाणे यांनी दिला.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;