वीज समस्यांनी चिपळूणवासिय त्रस्त, महाविकास आघाडीची चिपळूण महावितरण कार्यालयावर धडक

वीज समस्यांनी चिपळूणवासिय त्रस्त, महाविकास आघाडीची चिपळूण महावितरण कार्यालयावर धडक

चिपळूण शहरातील वीज समस्यांबाबत महावितरण कंपनीच्या कार्यालयावर महाविकास आघाडीने धडक दिली. कार्यकारी अभियंत्यांना धारेवर धरत प्रश्नांचा भडीमार केला. या समस्या येत्या पंधरा दिवसात कमी होण्याच्या दृष्टीने अंमलबजावणी सुरू करत आहोत, असे आश्वासन कार्यकारी अभियंता अनिल गेडाम यांनी दिले.

गेल्या काही दिवसांपासून वीज ग्राहकांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. यामध्ये वारंवार वीज पुरवठा खंडित होणे, ए बी सी स्विच असूनही ते कार्यरत नसणे, तक्रार मोबाईल कायम बिझी असणे, झाडाच्या फांद्या वारंवार वायरवर पडून वीज पुरवठा खंडित होणे, नविन ट्रान्सफॉर्मर बसवणे, ग्राहकांना योग्य उत्तरे न मिळणे या विषयावर कार्यकारी अभियंता यांच्याजवळ चर्चा झाली. या वेळी त्यांनी या समस्या येत्या 15 दिवसात कमी होतील. त्याची अंमलबजावणी सुरू करत आहोत, असे आश्वासन कार्यकारी अभियंता गेडाम यांनी दिले.

यावेळी नेते राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेश सरचिटणीस प्रशांत यादव, शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे विधानसभा क्षेत्र प्रमुख बाळा कदम, तालुकाप्रमुख विनोद झगडे, काँग्रेसच्या महिला आघाडी चिपळूण तालुकाध्यक्ष निर्मला जाधव, माजी सभापती धनश्री शिंदे, स्वाती देवळेकर, प्राजक्ता सरफीरे शहरप्रमुख शशिकांत मोदी, माजी उपनगराध्यक्ष रतन पवार , राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार पक्षाच्या डॉ. रेहमत जबले, वैशाली शिंदे, भय्या लाड, संतोष पवार, संजय रेडिज, पार्थ जागुष्टे, प्रशांत मुळे, माजी नगरसेविका सफा गोठे, तेजस्वनी किंजलकर, सौ. रुही खेडेकर, अंजली कदम, राधिका तटकरे, सीमा चाळके, माधुरी शिंदे, श्रीनाथ खेडेकर,मनोज पांचाळ, निलेश आवले, संदेश किंजलकर , अमिता कानडे, अर्चना कारेकर, महेद्र कांबळी, सुशांत साळवी, अमोल टाकले, अनामिका हरदारे, रसिका चौधरी, विना जावकर , सफा गोठे , नंदा भालेकर, इम्तियाज कडू, संजय साळवी लियाकत शेख, गुलजार कुरवले, मंदार चिपळूणकर, शमून घारे, दिनेश लटके, राकेश दाते आदी उपस्थित होते.
.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;