महाराष्ट्र विकणाऱ्या मुख्यमंत्र्यांमध्ये एकनाथ शिंदेंचं नाव सर्वांत वर असेल; विजय वडेट्टीवार यांचा हल्लाबोल

महाराष्ट्र विकणाऱ्या मुख्यमंत्र्यांमध्ये एकनाथ शिंदेंचं नाव सर्वांत वर असेल; विजय वडेट्टीवार यांचा हल्लाबोल

काँग्रेसचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर टीकेची तोफ डागली आहे. महाराष्ट्र विकणाऱ्या मुख्यमंत्र्यांमध्ये एकनाथ शिंदे यांचं नाव सर्वात वर असेल, असे वक्तव्य करत वडेट्टीवार यांनी शिंदेंचा समाचार घेतला आहे. शिंदेंसह देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्यावरही वडेट्टीवार यांनी हल्लाबोल केला आहे.

महाराष्ट्राच्या सत्तेच्या खुर्चीत महाराष्ट्र विकणारी मंडळी बसली आहेत. कुंपणच शेत खातंय हे महाराष्ट्र बघतोय. एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली सरकारने कधी नव्हे एवढ्या जमिनी विकण्याचा सपाटा लावला आहे. महाराष्ट्र विकणारा मुख्यमंत्री कोण यावर उद्याचा इतिहास जेव्हा लिहिला जाईल तेव्हा एकनाथ शिंदे यांचे नाव सर्वात वर असेल, अशी टीका वडेट्टीवार यांनी केली आहे.

‘देवेंद्र फडणवीस तिकडे फडफड करत आहेत’, असेही वडेट्टीवार यांनी म्हटले आहे. तर अजित पवार यांच्याबाबत भाजपने वापरा आणि फेका नीती वापरली आहे, असे म्हणत वडेट्टीवार यांच्या भाजपच्या कुटिल राजकारणावर टीका केली आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;