नांदेडमध्ये लाडकी बहिण कार्यक्रमात वाटल्या फाटक्या साड्या, महिलांचा संताप
विधानसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर मिंधे सरकारने राज्यात लाडकी बहिण योजना सुरू केली. या योजनच्या अनुषंगानें नांदेडमध्ये मिंधे गटाकडून एका कार्यक्रमाचे आयोजन केले होते. त्या कार्यक्रमात महिलांना साड्या वाटप करण्यात आल्या. मात्र या साड्या फाटलेल्या असल्याचा आरोप महिलांनी केला आहे. फाटलेल्या साड्या व अत्यंत ढिसाळ आयोजन असल्याने संतप्त महिलांनी मिंधे गटाला फटकारले आहे. तसेच ”प्यायला पाणी देखील ठेवले नाही… आमचे हाल करायला बोलावले का आम्हाला?”, असा संतप्त सवाल महिलांनी केला आहे. TV9 या वृत्तवाहिनीने याबाबत वृत्त दिले आहे.
नांदेडच्या हिमायतनगर येथे मिंधे गटाकडून लाडकी बहिण सन्मान सोहळा आयोजित केला होता. या कार्यक्रमाला गर्दी व्हावी यासाठी मिंधे गटाकडून साडी वाटपाचे देखील आयोजन करण्यात आले होते. साडी वाटप असल्याने या ठिकाणी महिलांची झुंबड उडाली होती मात्र आयोजकांनी अत्यंत वाईट पद्धतीने आयोजन केल्याने महिलांचे प्रचंड हाल झाल्याचे समोर आले आहे. प्यायला पाणी नाही, बसायला जागा नाही अशा परिस्थिती लहान बाळांना घेऊन दूर दूरवरून आलेल्या महिलांच्या हातात फाटक्या साड्या मिंधे गटाकडून टेकवण्यात आल्या. त्या साड्या बघून महिलांच्या सहनशीलतेचा बांध फुटला व त्यांनी आयोजन करणाऱ्या मिंधे गटाच्या नेत्यांना फटकारले.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List