Thane news – राणेंच्या पंटरवर विनयभंग, अ‍ॅट्रॉसिटीचा गुन्हा

Thane news – राणेंच्या पंटरवर विनयभंग, अ‍ॅट्रॉसिटीचा गुन्हा

गृहनिर्माण प्रकल्पामध्ये माथाडीच्या कामाचे कंत्राट मिळाले नाही म्हणून भाजपचे खासदार नारायण राणे यांचा पंटर विजय त्रिपाठी याने रागाच्या भरात ठेकेदार सुशील बेनवाल याला मारहाण करीत जातिवाचक शिवीगाळ केली. याप्रकरणी त्रिपाठी याच्यावर अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल केला आहे. तर एका तरुणीची छेडछाड केली म्हणून विनयभंगाचाही गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

प्रादेशिक मनोरुग्णालय परिसरात सुरू असलेल्या गृहनिर्माण प्रकल्पामध्ये आपल्याला माथाडीचे कंत्राट मिळावे म्हणून विजय त्रिपाठी हा प्रयत्न करत होता. पण प्रत्यक्षात ते काम त्याला न मिळता वाल्मिकी समाजाच्या सुशील बेनवाल याला मिळाले. या रागातून त्रिपाठी याने मारहाण करीत तुम्ही खालच्या जातीचे लोक अशी कामे कशी मिळवता असे सुनावले. त्यामुळे त्रिपाठीवर कारवाई करण्यात आली. दरम्यान धर्मवीरनगर येथे काही दिवसांपूर्वी झालेल्या बैठकीत त्याने एका तरुणीचा विनयभंगदेखील केला होता.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;