बिश्नोई गँगच्या रडारवर पुन्हा सलमानचं कुटुंब, मॉर्निक वॉकला गेलेल्या सलीम खान यांना बुरख्यात आलेल्या महिलेची धमकी

बिश्नोई गँगच्या रडारवर पुन्हा सलमानचं कुटुंब, मॉर्निक वॉकला गेलेल्या सलीम खान यांना बुरख्यात आलेल्या महिलेची धमकी

बॉलिवूड अभिनेता सलमान खान याच्यामागे लागलेले लॉरेन्स बिश्नोई गँगचे विघ्न अद्याप संपलेले नाही. सलमानचे वडील सलीम खान यांना बिश्नोई गँगने धमकी दिली आहे. सलीम खान बुधवारी सकाळी मॉर्निंग वॉकला गेले असताना बुरख्यात आलेल्या एका महिलेने त्यांनी धमकी दिल्याचे समोर आले आहे. ‘इंडिया टूडे’ने सूत्रांच्या हवाल्याने याबाबत वृत्त दिले आहे.

सलीम खान हे रोजच्याप्रमाणे 18 सप्टेंबर रोजीही मॉर्निंग वॉकला गेले होते. एका बागेत बाकड्यावर निवांत बसलेले असताना गॅलेक्सीकडून बँडस्टॅण्डच्या बाजूने जाणाऱ्या रस्त्यावरून एक स्कुटी आली. ही स्कुटी एक पुरुष चालवत होता आणि मागे बुरखा घातलेली महिला बसली होती.

अचानक या स्कुटीने यू टर्न घेतला आणि महिलेने सलीम खान यांच्याजवळ येत लॉरेन्स बिश्नोईला पाठवू का? असे म्हटले. या स्कुटीचा नंबर 7444 होता. यानंतर सलीम खान यांनी तत्काळ पोलिसांशी संपर्क साधला. पोलिसांनी तत्काळ कारवाई करत बुरख्यातील महिलेला पकडले आहे.

सलमानच्या ताफ्यात एक जण शिरला 

विशेष म्हणजे सलमान खानही सध्या मुंबईत नाही. बुधवारी रात्री त्याला मुंबईतील विमानतळावर पाहण्यात आले होते. त्यामुळे त्याच्या अनुपस्थितीत लॉरेन्स बिश्नोई गँगने त्याचे वडील सलीम खान यांना धमकी दिली असून यामुळे चाहत्यांनाही धक्का बसला आहे.

दरम्यान, बिश्नोई गँगकडून सलमानला धमकी दिल्याची ही पहिलीच घटना नाही. गेल्या अनेक वर्षापासून बिश्नोई गँगच्या रडारवर सलमान आहे. लॉरेन्स बिश्नोई आणि मोस्ट वॉन्टेड गँगस्टर गोल्डी बराड याने अनेकदा सलमानला जीवे मारण्याची धमकी दिली आहे. सलमानला धमकीचे ईमेलही आले होते. तसेच त्याच्या घरावरही गोळीबार झाला होता.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;