‘भटकंती’मध्ये निसर्गाचा आविष्कार, सुभाष शेगोकार यांचे चित्रप्रदर्शन

‘भटकंती’मध्ये निसर्गाचा आविष्कार, सुभाष शेगोकार यांचे चित्रप्रदर्शन

प्रसिद्ध चित्रकार सुभाष शेगोकार यांचे ‘भटकंती’ हे चित्रप्रदर्शन काळाघोडा येथील जहांगीर कलादालनात आयोजित करण्यात आले आहे. प्रदर्शन 22 सप्टेंबर दरम्यान सकाळी 11 ते सायंकाळी 7 यावेळेत पाहता येईल. यामध्ये अ‍ॅक्रॅलिक, जलरंग माध्यमातील चित्रे आहेत.

सुभाष शेगोकार गेली 25 वर्षे आर्टिस्ट म्हणून कार्यरत आहेत. वास्तववादी, निसर्गाच्या सान्निध्यातील कलाकृती असे सुभाष शेगोकार यांच्या शैलीचे वर्णन करता येईल. अंबरनाथ येथे राहणारे सुभाष शेगोकार अनेक ठिकाणी भटपंती करून तिथे चित्रे काढतात.

विशेष म्हणजे ज्या ठिकाणांना सुभाष शेगोकार भेट देतात ती ठिकाणे, तिथले वातावरण चित्रांच्या माध्यमातून कलारसिकांपर्यंत पोचवतात. ‘भटकंती’ प्रदर्शनात अंबरनाथ, रत्नागिरी, शहापूरचे आदिवासी पाडे, वाराणसी, राजस्थान अशा अनेक ठिकाणची चित्रे आहेत. प्रदर्शन निःशुल्क आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;