सिंधुदुर्गात गाडीला साईड देताना एसटी कलंडली, जवळच दरी असल्याने सुदैवाने जीवितहानी नाही

सिंधुदुर्गात गाडीला साईड देताना एसटी कलंडली, जवळच दरी असल्याने सुदैवाने जीवितहानी नाही

एका गाडीला साईड देताना एसटी बस कलंडली आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात ही दुर्घटना घडली असून सुदैवाने कुठलीही जीवितहानी झालेली नाही.

देवगड एसटी स्थानकातून देवगड- तळेबाजार- वानिवडेमार्गे मोंड ही बसफेरी सकाळी 8 वाजता सुटते. या एसटी बस फेरीचा लाभ शालेय विद्यार्थी घेत असतात. गणेश चतुर्थीच्या सुट्टीनंतर बुधवारपासून शाळा सुरू झाल्या आहेत. त्यामुळे मोंड एसटीतून प्रवाशांसह विद्यार्थीही प्रवास करीत होते. ही एसटी मोंडपार अनभवणेवाडी येथील जि. प. प्राथमिक शाळेनजीकच्या अरुंद वळणावर आली असता समोरून आलेल्या वाहनाला बाजू देताना या रस्त्यानजीक कलंडली. चालकाने प्रसंगावधान राखून एसटी नियंत्रणात आणल्याने सुमारे 50 फूट खोल दरी जवळ मोठा अनर्थ टळला. विद्यार्थ्यांसह एसटीतील प्रवाशांना एसटीच्या संकटकालीन मार्गाने एसटीतून सुखरुप बाहेर काढण्यात आले. स्थानिक ग्रामस्थ मदतकार्यात सहभागी झाले होते. या रस्त्यानजीक सुमारे 50 फूटाची खोल दरी असून तेथे संरक्षक भिंत व्हावी, अशी मागणी होत आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;