Pune News – अनैतिक संबंधातून आधी प्रियकराचा काटा काढला, मग पत्नीलाही संपवण्याचा प्लान होता; पण…

Pune News – अनैतिक संबंधातून आधी प्रियकराचा काटा काढला, मग पत्नीलाही संपवण्याचा प्लान होता; पण…

अनैतिक संबंधाच्या रागातून बिहारमधील शिक्षकाने पुण्यात येऊन पत्नीच्या प्रियकराची हत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. आरोपी ट्रेन पकडून बिहारला पळण्याच्या तयारीत असतानाच पिंपरी-चिंचवड पोलिसांनी कल्याणमध्ये त्याला गाठले आणि बेड्या ठोकल्या. राजीव कुमार असं आरोपीचं नाव आहे. तर प्रविण महतो असे मयताचे नाव आहे.

राजीव कुमार हा बिहारमधील सरकारी शाळेत शिक्षक आहे. राजीवचे सात वर्षांपूर्वी लग्न झाले होते. मात्र गेल्या चार वर्षांपासून कौटुंबिक वादामुळे पती-पत्नी विभक्त राहत आहेत. यादरम्यान आरोपीच्या घराशेजारी राहणारा प्रविण पत्नीच्या संपर्कात आला. दोघांनी एकमेकांना मोबाईल नंबर दिले. मग दोघांमध्ये बोलणे सुरु झाले. हळूहळू दोघांमध्ये मैत्री मग प्रेमसंबंध जुळले.

प्रविण बिहारला गावी गेला की दोघांच्या गाठीभेटी होत असत. दीड महिन्यांपूर्वी आरोपी राजीवच्या पत्नी आणि प्रविणचा एक फोटो नजरेस पडला. हा फोटो पाहताच राजीवचा संताप झाला आणि त्याने दोघांचा काटा काढण्याचे ठरवले. मात्र प्रविण हा पुण्यात नर्सरी चालवत होता.

प्रविणच्या नर्सरीत काम करून बिहारला परतलेल्या धीरजला राजीवने गाठले. धीरजसोबत त्याने पुणे गाठले. त्यानंतर मंगळवारी रात्री 12 च्या सुमारास बावधन येथील नर्सरीवर येऊन प्रविणचा गळा चिरुन त्याची हत्या केली. यानंतर आरोपींनी पुन्हा पुणे स्टेशन गाठले आणि बिहारसाठी रवाना झाले.

याचदरम्यान हिंडवडी पोलिसांना बावधनमध्ये एका व्यक्तीची हत्या झाल्याची माहिती मिळाली. पोलिसांनी घटनास्थळ गाठून वेगाने तपास सुरु केला. यावेळी प्रविणच्या अनैतिक संबंधाची माहिती पोलिसांना मिळाली. त्या दृष्टीने तपास करत पोलिसांनी राजीवचे लोकेशन काढले असता तो बिहारमधून पुण्यात आल्याची आणि बिहारला जात असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पोलिसांनी प्रविणचे लोकेशन ट्रेस करत कल्याण पोलिसांच्या मदतीने कल्याणमधून राजीवसह धीरजला अटक केली.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;