मोबाईल ऐवजी लॅपटॉप वापरल्यावर चष्म्याचा नंबर वाढणार नाही, नेत्रविशारद डॉ. तात्याराव लहाने यांचा सल्ला

मोबाईल ऐवजी लॅपटॉप वापरल्यावर चष्म्याचा नंबर वाढणार नाही, नेत्रविशारद डॉ. तात्याराव लहाने यांचा सल्ला

स्क्रीन टाईम जास्त असल्यामुळे डोळ्यांवर परिणाम होतात आणि चष्म्याचा नंबर वाढतो. त्यामुळे मोबाईलवरच्या स्क्रीनवर बघण्यापेक्षा त्याच अ‍ॅक्टिव्हिटी डेस्कटॉप, लॅपटॉप किंवा टीव्हीवर केल्यास डोळ्यांवर परिणाम होत नाही असा सल्ला नेत्रविशारद डॉ. तात्याराव लहाने यांनी दिला आहे.

सामनाशी बोलताना डॉ. लहाने म्हणाले की, मोबाईलमधून ब्ल्यु लाईटमुळे डोळ्यांना त्रास होतो. मोबाईलमध्ये असणारे व्हॉट्सअ‍ॅप आणि युट्युब जर लॅपटॉपवर वापरले तर डोळ्यांना त्रास होत नाही. मोबाईल आणि टॅबवरचा स्क्रीन टाईम कमी करावा. लॅपटॉप, डेस्कटॉप वापरताना प्रत्येक 20 मिनिटानंतर उजवीकडे डावीकडे भिंतीकडे पहावं. यासाठी 20-20-20 हा फॉर्म्युला वापरावा. 20 मिनिटानंतर 20 फुटांवर 20 सेकंदांसाठी पहावे. दोन तासांनी दोन मिनिटांसाठी डोळे बंद करावेत. तसेच लॅपटॉप आणि डेस्कटॉपची स्क्रीन सहा इंच खाली ठेवावी त्यामुळे डोळे कोरडे पडत नाहीत. मोबाईलचा स्क्रीन टाईम कमी केल्यावर चष्म्याचा नंबर वाढणार नाही असेही डॉ. लहाने म्हणाले

या लिंकवर जाऊन तुम्ही डॉ. तात्याराव लहाने यांची संपूर्ण मुलाखत पाहू शकता.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;