आई झाल्यानंतर दीपिका पादुकोनने खरेदी केलं कोट्यवधीचं नवीन घर

आई झाल्यानंतर दीपिका पादुकोनने खरेदी केलं कोट्यवधीचं नवीन घर

बॉलीवूडमधील स्टार कपल दीपिका पादुकोन आणि रणवीर सिंह यांना 8 सप्टेंबर रोजी कन्यारत्न झाले. आई झाल्याच्या एका आठवड्यानंतरच दीपिकाने नवीन घर खरेदी केले आहे. सासूच्या घराजवळच वांद्रे येथे दीपिकने नवीन घर खरेदी केले आहे. या घराची किंमत 17.8 कोटी रुपये इतकी आहे.

वांद्रे येथील सागर रेशम कॉर्पोरेटिंग हाऊसिंग सोसायटीमध्ये पंधराव्या मजल्यावर दीपिकाने नवीन घर घेतले आहे. या सोसायटीमध्ये 4 बीएचके आणि 5 बीएचके अपार्टमेंट आहेत. दीपिकाचे वडील सहमालक असलेल्या कंपनीच्या नावे हा 171.47 स्क्वेअर मीटरचा फ्लॅट खरेदी करण्यात आला आहे.

याआधी दीपिका आणि रणवीरने वांद्रे येथे शाहरुख खानच्या मन्नत बंगल्याजवळच 100 कोटींचा फ्लॅट बुक केला आहे. या इमारतीचे सध्या बांधकाम सुरू आहे. हे अपार्टमेंट तयार झाल्यानंतर दीपिका आणि रणवीर येथे शिफ्ट होणार आहेत.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;