फडणवीसांना कितीही गणितं करू द्या, मी त्यांची सगळी गणितं फेल करणार; मनोज जरांगे आक्रमक

फडणवीसांना कितीही गणितं करू द्या, मी त्यांची सगळी गणितं फेल करणार; मनोज जरांगे आक्रमक

मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील आक्रमक झाले असून त्यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पुन्हा इशारा दिला आहे. देवेंद्र फडणवीसांना कितीही गणितं करू द्या, मी त्यांची सगळी गणितं फेल करणार, असा हल्लाबोल मनोज जरांगे यांनी केला आहे. तुम्ही महाराष्ट्राच्या मराठ्यांना मूर्ख समजता का? असा थेट सवालही मनोज जरांगे यांनी केला आहे. आमच्या मागण्या मान्य करा नाहीतर सर्वांचं राजकीय करिअर उद्ध्वस्त करून टाकेन, असा इशाराही त्यांनी महायुती सरकारला दिला.

दुसऱ्याला मूर्ख समजायला लागलेत का? दोन-तीन दिवसात सगळे विषय मार्गी लावा. जास्त नाटकं करायचं नाहीत. प्रक्रिया चालू आहे, वाचत आहोत, हरकती आल्या आहेत, हे बघतो ते बघतो, केसेस पोलीस बघताहेत, ही नाटकं करायची नाहीत. मी रस्त्यावर आलो, राजकीय वाटेवर आलो तर तुमचा खेळ खल्लास, असा इशारा मनोज जरांगे यांनी दिला.

धनगरांना आणि मुसलमानांनाही फडणवीसांचा अडथळा होता. शेतकऱ्यांच्या प्रश्नालाही तेच अडथळा आहेत. गोरगरीब ओबीसींच्या आणि मराठ्यांच्या प्रश्नाला तेच अडथळा आहेत. सरपंचाचा काही उपयोग नाही, सध्या उपसरपंच सर्व कारभार हाकतो. देवेंद्र फडणवीस सर्व कारभार पाहतात, सरपंचाच्या हातात काही नाही, असे म्हणत मनोज जरांगे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना टोला लगावला.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;