राहुल गांधी यांना दहशतवादी म्हणणे हे पाप; काँग्रेसचा भाजपवर हल्लाबोल

राहुल गांधी यांना दहशतवादी म्हणणे हे पाप; काँग्रेसचा भाजपवर हल्लाबोल

भाजप राहुल गांधी यांच्याविरोधात मोठे कटकारस्थान आणि षडयंत्र रचत आहे. गांधी घराण्याने देशासाठी बलिदान दिले आहे. असे असताना भाजप नेते राहुल गांधी यांना मारण्याची धमकी देत आहेत. भाजप नेते राहुल गांधी यांना दहशतवादी म्हणत आहेत. राहुल गांधी यांना दहशतवादी म्हणणे हे पाप आहे, अशा शब्दांत काँग्रेसने भाजपवर हल्लाबोल केला आहे.

भाजप नेते राहुल गांधी यांना मारण्याची धमकी देत आहेत. ते राहुल गांधी यांना दहशतवादी म्हणत आहेत. भाजपने राजकारण खालच्या स्तराला नेले आहे. भाजपमधील नेतेच धमकीचा भाषा करत आहेत. त्यांच्या वरिष्ठांच्या आदेशानेच हे होत आहे काय,असा संतप्त सवाल अजय माकन यांनी केला आहे. तसेच आम्हाला कितीही धमक्या द्या, मात्र आमचा आवाज तुम्ही दाबू शकणार नाही, असा इशाराही माकन यांनी दिला आहे. भाजपचा मित्रपक्ष असलेल्या मिंधे गटातील नेत्याने राहुल गांधी यांची जीभ कापणाऱ्याला 11 लाखांचे बक्षीस देण्यात येईल, असे विधान केले आहे. याप्रकरणी आम्ही गुन्हा दाखल केला आहे, असेही माकन म्हणाले.

भाजप नेते अशा प्रकारची दर्पोक्ती करत आहेत. धमक्या दोत आहे. राहुल गांधी यांना दहशतवादी म्हणण्यात येत आहे. असे असताना भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा, पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा अशा नेत्यांवर कठोर कारवाई करण्याऐवजी फक्त बघ्याची भूमिका घेत आहेत, हे दुर्दैवी आहे, असे काँग्रेस नेते अशोक गेहलोत यांनी म्हटले आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;