Nagar News – नगरमध्ये 2 युवकांचा तलावात बुडून मृत्यू, गणपती विसर्जनादरम्यान घडली घटना

Nagar News – नगरमध्ये 2 युवकांचा तलावात बुडून मृत्यू, गणपती विसर्जनादरम्यान घडली घटना

नगर-गणपती विसर्जनादरम्यान अनेक ठिकाणी गालबोट लागल्याची घटना घडली आहे. काही ठिकाणी दगडफेकीच्या घटना घडल्या आहेत. तर काही ठिकाणी तलावात बुडून मृत्यू झाल्याच्या घटना घडल्या आहेत. नगरमध्ये 2 युवकांचा तलावात बुडून मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.

अजिंक्य नवले आणि केतन शिंदे अशी मृत युवकांची नावे आहेत. नगरमध्ये गणपती विसर्जना दरम्यान 2 युवकांचा तलावात बुडून मृत्यू झाला आहे. मंगळवारी सायंकाळी विळद गावातील साकळाई तलाव इथं ही घटना घडली आहे. या घटनेनंतर परीसरात हळहळ व्यक्त केली

घरगुती गणपती विसर्जन करत असताना पाय घसरुन तलावात पडल्याने बुडून मृत्यू झाला आहे. अजिंक्य नवले आणि केतन शिंदे अशी मृत युवकांची नावे आहेत. स्थानिक नागरिक आणि महापालिका आपत्ती व्यवस्थापन पथकाच्या मदतीने मृतदेह बाहेर काढले आहे. एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;