भ्रष्ट महायुतीला सत्तेतून हटवणे हेच आमचे उद्दीष्ट्य; नाना पटोलेंनी स्पष्ट केली भूमिका

भ्रष्ट महायुतीला सत्तेतून हटवणे हेच आमचे उद्दीष्ट्य; नाना पटोलेंनी स्पष्ट केली भूमिका

लोकसभा निवडणुकीत राज्यात जनतेने महाविकास आघाडीला चांगला प्रतिसाद दिला आहे. आता विधानसभा निवडणुकीतही जनतेचा कौल महाविकास आघाडीच्या बाजून दिसत असून राज्यातील भ्रष्ट महायुतीला सत्तेवरून हटवणे, हेच महाविकास आघाडीचे ध्येय आहे. त्यासाठी महाविकास आघाडी प्रयत्न करत आहे. तसेच काँग्रेसचा प्रदेशाध्यक्ष म्हणून भ्रष्ट महायुती सरकारला हटवणे आणि राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आणणे हेच आपले ध्येय असल्याचे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी स्पष्ट केले.

महाविकास आघाडीत जागावाटपाबाबत कोणताही वाद किंवा मतभेद नाहीत. आम्ही आमच्या मित्रपक्षांशी चर्चा करून जागावाटपाबाबत निर्णय घेत आहोत. भ्रष्ट महायुतीचे संकट राज्यातून दूर करण्यासाठी आम्ही एकत्र आलो आहोत. त्यामुळे या निवडणुकीत महाविकास आघाडीला जास्तीत जास्त जागा मिळाव्यात यासाठी आमचे प्रयत्न सुरू आहे. तसेच हाच हेतू समोर ठेवत जागा वाटप करण्यात येत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

राज्यात महायुतील सत्तेतून हटवून महाविकास आघाडी सत्तेत येणार असल्याचा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. तसेच आता मुख्यमंत्रीपदाबाबत कोणताही निर्णय घेण्यात येणार नाही. जास्तीतजास्त जागा मिळवण्याचे उद्दीष्ट सध्या आमच्यासमोर आहे. विधानसभा निवडणुकीत विजय मिळाल्यावर महाविकास आघाडीतील नेते मुख्यमंत्रीपदाबाबत चर्चा करून निर्णय घेतील. त्यामुळे महाविकास आघाडीत कोणताही वाद किंवा मतभेद नसून विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीचीच सत्ता येणार असा विश्वास पटोले यांनी व्यक्त केला आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;