भाजपला धक्का; पठारे कुटुंबीय आणि अन्य पदाधिकारी समर्थकांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश

भाजपला धक्का; पठारे कुटुंबीय आणि अन्य पदाधिकारी समर्थकांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश

राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार)पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत वडगाव शेरी विधानसभा मतदार संघाचे माजी आमदार बापू पठारे आणि त्यांचे चिरंजीव सुरेंद्र पठारे यांनी माजी नगरसेवक महादेव पठारे, महेंद्र पठारे व भैय्यासाहेब जाधव यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष- शरदचंद्र पवार पक्षात पक्षप्रवेश केला. शरद पवार यांनी यावेळी त्यांचे पक्षात स्वागत करून त्यांना पुढील राजकीय व सामाजिक वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. यावेळी सुहास उभे उपस्थित होते. बापूसाहेब पठारे यांच्या घरवापसीमुळे भाजपला धक्का बसला आहे.

2019 च्या विधानसभा निवडणुकीच्या अगदी जवळपास बापू पठारे यांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता. मात्र आता त्यांनी पुन्हा मूळ राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात पुर्नप्रवेश केला असल्यानं भाजपला तो मोठा फटका मानला जात आहे. दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या सुप्रीया सुळे यांनी त्यांचे पक्षात स्वागत केले आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;