अभिनेत्री ऐश्वर्या राय आणि राणी मुखर्जी यांची मैत्री कशी तुटली, अभिषेक बच्चनही एक कारण ?

अभिनेत्री ऐश्वर्या राय आणि राणी मुखर्जी यांची मैत्री कशी तुटली, अभिषेक बच्चनही एक कारण ?

रुपेरी पडद्यावरील मोहमयी दुनियेत सेलिब्रिटीचं नातं जुळतं बिघडतं. कधी कधी सिनेमाच्या सेटवर झालेली तोंड ओळख नंतर घट्ट मैत्रीत परावर्तित होते. त्यांच्या मैत्रीचं उदाहरण दिले जाते. अनेकदा मैत्री होते तर अगदी शत्रूत्व देखील होते. सौदर्यवती अभिनेत्री ऐश्वर्या राय आणि राणी मुखर्जी या एकेकाळच्या घट्ट मैत्रिणी होत्या. त्यानंतर त्यांच्यात अचानक शत्रुत्व सुरु झाले. मैत्रितील दूर मिटलेली नाही.असे काय झाले चला पाहूयात काय नेमका किस्सा पाहूयात…

ऐश्वर्या राय आणि राणी मुखर्जी यांच्यात घट्ट मैत्री होती. दोघी मैत्रिणी एकमेकींच्या सुख आणि दुखात सामील होत होत्या. अनेक इव्हेंटमध्ये त्या दोघी एकत्र असत. ऐश्वर्या राय आणि राणी मुखर्जी यांच्यात मैत्रीला नजर लागली. साल 2003 मध्ये चलते चलते या चित्रपटासाठी शाहरुख खान आणि ऐश्वर्या या दोघांनी कास्ट केले होते. शुटींग देखील सुरु झाली होती, या चित्रपटात अचानक ऐश्वर्या राय हीचा पत्ता कट झाला आणि राणी मुखर्जीला कास्ट केले गेले.

त्यावेळी ऐश्वर्या आणि सलमान यांच्यात ब्रेकअप सुरु झाले होते. सलमान सेटवर जाऊन हंगामा करीत असल्याने ऐश्वर्या राय हीला काढण्यात आले होते..त्यानंतर काजोल हीला शाहरुख खान याने चलते चलते ची ऑफर दिली होती. परंतू तिने नकार दिल्यानंतर राणी मुखर्जीला हा चित्रपट मिळाला. त्यानंतर ऐश्वर्या आणि राणी यांच्या नात्यात दरार पडली. ऐश्वर्या हीला आपली फसवणूक झाल्यासारखे वाटले.राणी आणि शाहरुख दोन्ही तिचे मित्र असूनही दोघांनीही तिला विश्वासात न घेतल्याने ती चिडली होती.

या दोघींच्या मैत्रीणीत फूट पडण्यामागे अभिषेक बच्चन देखील कारणी भूत होता. अभिषेक आणि राणी मुखर्जी यांच्यात ‘बंटी और बबली’, ‘कभी अलविदा न कहना’, ‘बस इतना सा ख्वाब है’ अशा चित्रपटामुळे चांगली मैत्री झाली आणि त्याचे रुपांतर प्रेमात झाले. भन्साली यांच्या ब्लॅक चित्रपटात बिग बि अमिताभ आणि अभिनेत्री राणी मुखर्जी यांच्यात चुंबन दृश्य चित्रित झाले होते. त्यामुळे जया बच्चन यांनी सून म्हणून राणी नको होती असे म्हटले जाते.

दिग्दर्शक मणी रत्नम यांच्या धीरुभाई अंबानी यांच्या जीवनावर बेतलेल्या ‘गुरु’ चित्रपटात अभिषेक आणि ऐश्वर्या राय एकत्र आल्याने त्यांच्या मेतकुट जुळले.त्यानंतर साल 2007 मध्ये त्यांनी लग्न केले.परंतू राणीला या लग्नाला बोलावले नाही. त्यामुळे राणी आणि ऐश्वर्यात आणखी नातं बिघडले.एका मुलाखती राणीने म्हटले होते की तिने जर मला लग्नाला बोलावले असते तर मी नक्की गेली असती. त्यानंतर मात्र दोघीमध्ये बोलचाल झाल्याचे पुरावे नाही, त्यानंतर साल 2014 मध्ये इटलीत जाऊन निर्माता आदित्य चोपडा याच्याशी राणीने लग्न केले. यानंतर तिला मुलगी झाली तिचे नाव अदिरा असे आहे.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;