गणपती बाप्पा मोरया! पुढच्या वर्षी लवकर या! गणपती बाप्पांचे वाजत-गाजत विसर्जन

गणपती बाप्पा मोरया! पुढच्या वर्षी लवकर या! गणपती बाप्पांचे वाजत-गाजत विसर्जन

गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या,मंगलमूर्ती मोरया.गणपती गेले गावाला चैन पडेना आम्हाला अशा जयघोषात आज अनंत चतुदर्शी दिवशी गणपती बाप्पांना वाजत-गाजत निरोप देण्यात आला.ढोल ताशांच्या गजरात फटाक्यांच्या आतषबाजीत आज गणपती विसर्जनाच्या मिरवणूका निघाल्या.रत्नागिरी जिल्ह्यात आज 37 हजार 805 घरगुती गणपती आणि 65 सार्वजनिक गणपतींचे विसर्जन झाले.

गेले दहा दिवस कोकणात मंगलमय वातावरणात गणेशोत्सव साजरा झाला. 7 सप्टेंबर रोजी गणपतीबाप्पाचे वाजतगाजत आगमन झाले. रत्नागिरी जिल्ह्यामध्ये 1 लाख 66 हजार 867 घरगुती गणपती आणि 122 सार्वजनिक गणपतींची प्रतिष्ठापना करण्यात आली. गेले दहा दिवस कोकणात मंगलमय वातावरणात गणपतीची पुजाअर्चा करण्यात आली. भजन, जाखडी गावोगावी जल्लोषात गणेशोत्सव साजरा झाला. घरच्या गणपतीसाठी चाकरमानीही मोठ्या प्रमाणात कोकणात दाखल झाले आहेत. गौरी-गणपती विसर्जनानंतर काही चाकरमानी मुंबईकडे परतले आहेत.आज अनंतचतुर्दशी दिवशी वाजतगाजत गणपतीबाप्पांना निरोप देण्यात आला. उद्या रत्नागिरी जिल्ह्यामध्ये 37 हजार 805 घरगुती गणपती आणि 65 सार्वजनिक गणपतींचे विसर्जन करण्यात आले.विसर्जनानिमित्त पोलीसांनी कडक बंदोबस्त ठेवला होता. रत्नागिरी शहरामध्ये मांडवी आणि भाट्ये समुद्रकिनारी गणेशमूर्ती विसर्जन सोहळा रंगला.हा विसर्जन सोहळा पाहण्यासाठी नागरीकांनी मोठी गर्दी केली होती.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;